Viral Video Soil In Eye Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video Soil In Eye: डोळ्यात गेलेली माती आजीने थेट जीभेने बाहेर काढली; रामबाण उपाय पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Soil In Eye: ही पध्दत अतिशय किळसवाणी असून, हा आगळा वेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video: पायात काटा रुतणे, मान मुरगळणे, पोट दुखी या सर्व आजारांवर आजीकडे रामबाण उपाय हमखास सापडतात. आत्तापर्यंत तुम्ही देखील असे उपाय अनुभवले असतील. डोळ्यामध्ये कचरा गेल्यावर प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने बाहेर डोळे स्वच्छ करतात. काही व्यक्ती डोळ्यांवर पाण्याचा हपका मारतात. मात्र, तुम्ही जीभेने डोळ्यातला कचरा काढताना पाहिलं आहे का? सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तरुणीच्या डोळ्यामध्ये माती गेली आहे. डोळ्यात माती जाऊन ती अस्वस्थ झालीये. डोळ्यातील माती काढण्यासाठी ती तरुणी एका आजीकडे आलेली आहे. दरम्यान, त्या आजींनी अतिशय विचीत्र पध्दतीने डोळ्यातून माती काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यांची ही पध्दत अतिशय किळसवाणी असून, हा आगळा वेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या आजी चक्क तरुणीच्या डोळ्यामध्ये जीभ घालून मातीचा खडा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. डोळ्याला जीभ लावत माती काढतानाचा व्हिहिओ @poojabishnoi36 या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. पुजा ही एक खेळाडू आहे. तिने हा गावराण आणि रामबाण उपाय शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, माझ्या डोळ्यात खेळताना माती गेली होती. ती या आजींनी जीभेने बाहेर काढली. याचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केल्याचं देखील तिने सांगितलं आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्यात. एका युजरने व्हिडिओ पाहून यावर लिहिलं आहे की, आजी ज्या पद्धतीने डोळ्यातील कचरा काढत आहे असे अनेक गावांमध्ये केले जाते. मात्र याने डोळ्याचे इंफेक्शन आनखी वाढण्याची शक्यता असते. शक्यतो असे न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर अनेकांनी व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT