Walk-in-interview Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Walk-in-interview Viral Video: बापरे! इंटरव्ह्यूसाठी तरुणांची तोबा गर्दी; व्हिडिओ बघूनच धडकी भरेल!

Viral Video: भारत हा १४० कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. भारत हा विकसनशील देश म्हणुन ओळखला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video

भारत हा १४० कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. भारत हा विकसनशील देश म्हणुन ओळखला जातो. देशाला विकसित बनवण्याच्या मोठा वाटा देशातील तरुण वर्गाचा आहे. मात्र आपल्या देशात अनेक तरुण असे आहेत ज्यांनी उत्तम शिक्षण घेतले आहे पण नोकरीपासून वंचित आहेत. अशातच नोकरीच्या महत्वाच्या टप्यातील मुलाखतीसाठी तरुणांनी प्रचंड गर्दी केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपण पाहू शकता की एका ऑफिसच्या बाहेर तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे. ही गर्दी कशासाठी नेमकी कशासाठी ...? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अनेकदा वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा फ्रीमध्ये काही मिळत असेल तेव्हा लोक गर्दी करतात. पण खरे पाहता ही व्हिडिओत दिसणारी गर्दी ही इच्छूक तरुण-तरुणींची एका कामाच्या मुलाखतीसाठी आहे. या व्हिडिओला बघून आपण डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही.

@IndianTechGuide या ट्वीटर अंकाऊटवरुन हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सदर व्हिडिओ हैदराबाद शहरातील आहे. व्हिडिओतील गर्दीला बघता हा प्रकार जितका गमतीदार वाटत असला तरी ही सध्याच्या तरुणाईतील गंभीर समस्या बनली आहे. या व्हिडिओची सत्यता 'साम टीव्ही डिजिटल'ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हैदराबादमधील वॉक-इन मुलाखतीची परिस्थिती'.एका यूजर्सने लिहिलं आहे की, 'लोकसंख्या नियंत्रण हे खूप महत्वाचे आहे' या व्हिडिओला १४ लाखाहून अधिक व्हूज मिळाले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Amaravati Politics: मतदानापूर्वी भाजपकडून मोठी कारवाई, १५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Bhandara : अन् अचानक आकाशातून पडले दगडाचे तुकडे, भंडार्‍यात उल्का वर्षाव झाल्याचा संशय, नेमकं सत्य काय?

Homemade Toner : तुम्हाला त्वचेचा ग्लो वाढवायचा आहे? मग हे ५ स्वस्तात मस्त टोनर घरीच बनवा

Prasar Bharti Jobs: प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT