Snake Wine Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Snake Wine Viral Video: हद्दच झाली राव! तरुणांनी प्यायली चक्क स्नेक वाइन; मेकिंग प्रोसेसचा विचित्र VIDEO व्हायरल

Snake Wine Video: ही वाइन पिण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीये.

Ruchika Jadhav

Viral Video:

सोशल मीडियावर सापांचे आजवर बरेच व्हिडीओ व्हायरल झालेत. गावात, खेड्यापाड्या आणि बऱ्याचदा माणवी वस्तीत देखील साप आढळतात. साप दिसला की लोकं आपला जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर हल्ला करतात. अशात सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती सापापासून बनवलेली वाइन पितायत.

सोशल मीडियावर व्हायर होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाइन शॉपच्या एका दुकानात विविध चिनीमातीच्या भांड्यांत स्नेक वाइन भरलेली आहे. ही वाइन पिण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीये. व्हिडीओत काही काचेच्या बॉटल्समध्येही साप आणि वाइन दिसतायत.

सापात विष असतं, त्याच्या दंशाने व्यक्ती कायमचा मृत्यू पावतो. मग तरी देखील लोक सापाची दारू कशी काय पितायत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चायना, जपान आणि व्हिएतनाम या देशांमध्ये ही वाईन प्यायली जाते.

व्हिडीओत दिलेल्या माहितीनुसार, जिवंत साप एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवला जातो. साप यात ठेवल्यावर त्यात साधी वाइन टाकली जाते. सापाला या वाइनमध्ये ३ ते ४ दिवस बंद ठेवलं जातं. सापाल भूक लागल्यावर तो ही वाइन पितो आणि उलटी करतो. त्याच्या उलटीमुळे सापाच्या शरीरातील सर्व वाईट गोष्टी बाहेर पडतात.

त्यानंतर जिवंत साप पुन्हा बाहेर काढला जातो. त्याला दुसऱ्या एका काचेच्या बॉटलमध्ये वाइन भरून ठेवले जाते. पुढे साप ही वाइन पिउन पिउन त्यातच मृत्यू पावतो. वाइनमध्ये अल्कोहोल असल्याने सापाचं विष देखील संपून जातं. जिवंत साप भरून ठेवलेली वाइन तब्बल ३ ते ४ वर्षे भरून ठेवली जाते. या वाइनमुळे केस गळतीसह अन्य समस्या दूर होतात, असं व्हिडीओत सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Local Body Election 2025 : मतदानासाठी काही पण ! दीड लाख खर्च केले, तरुण थेट ऑस्ट्रेलियातून सांगलीत आला

Smriti Mandhana-Palash Muchhal: स्मृती मंधाना- पलाश मुच्छल लवकरच अडकणार विवाह बंधनात...? नेमकं खर कारण काय?

१९ मिनिटांचा MMS व्हिडिओ तुफान व्हायरल; इन्फ्ल्युएंसरच्या डुप्लिकेटचा आणखी ३ व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Nagar Parishad Live : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 ठिकाणी नगरपरिषद निवडणुका झाल्या, त्या 6 ठिकाणी स्ट्रॉंग रूम

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे काय त्रास होतो? अमेरिकेतल्या डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT