भारत-नेपाळच्या सीमेवर स्थानिक पोलिसांनी लॉरेंस बिश्नोई आणि विक्रम बरार गॅगच्या २ शार्प शूटर्सला अटक करण्यात आलीय. पोलिसांनी या दोघांकडून शस्त्रे आणि काडतुसे जप्त केली आहेत. अटक झालेल्या दोघांवर हरियाणा आणि राजस्थानमध्ये लूट, दरोड्याचे गु्न्हे दाखल आहेत. (Latest News)
तिहार तुरुंगात बंद असलेल्या बिश्नोई टोळीच्या दोन शार्प शूटर्सला पोलिसांनी शस्त्रांसह अटक केलीय. जिल्हा पोलीस स्टेशनचे प्रमुख कांतेशकुमार मिश्रा यांनी याची माहिती दिलीय. हे गुन्हेगार काहीतरी मोठा कट करण्याची योजना आखात असल्याचं पोलीस अधिकारी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या दोन्ही शार्प शुटर्सविषयी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी भारत-नेपाळ सीमेवर नाकाबंदी करत विविध पोलिस ठाण्यांच्या मदतीने या दोघांचा कसून शोध घेतला. त्यानंतर यांना अटक करण्यात आलीय. शोध मोहिमेदरम्यान एकाकडे ९ एमएम पिस्तूल, दोन काडतुसे नेपाळच्या चलनी २१ हजार रूपये आणि भारतीय चलनाचे १२०० रुपये तसेच एक दुचाकी पोलिसांनी जप्त केलीय. याविषयीचे वृत्त दैनिक जागरण दिलंय.
पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे शशांक पांडे आणि पूर्व चंपारण जिल्ह्यातील (हरपूर गाव) त्रिभुवन साह यांना अटक केलीय. यांचे म्होरके हे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि विक्रम ब्रार आहेत. अटक केलेल्या शशांकवर दोन गुन्हे दाखल आहेत. शशांकने आम आदमी पार्टीच्या नेत्याकडून ५० लाख रुपये उकळले होते. तसेच त्याने अंबाला (हरियाणा) सेक्टर ९ येथील नेत्याच्या घरावर गोळीबार केला होता, याप्रकरणी शशांकवर गुन्हा दाखल आहे.
शशांक पांडेने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. शशांक हा विक्रम ब्रारच्या टोळीचा सदस्य आहे. आतापर्यंत त्याने ४ मोठे गुन्हे केले आहेत. त्यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये त्याने तुरुंगात भोगलाय. त्याचबरोबर इतर दोन गुन्ह्यांमध्ये तो बराच काळ वॉण्टेड होता.
दुसऱ्या आरोपीवर हरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलीस या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत. हे दोन्ही भारत-नेपाळ सीमेवर काही मोठी घटना घडवण्याचा कट रचत होते. पोलिसांना या दोघांची गुप्त माहिती मिळाली होती.
ही माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक सदर व एसडीपीओ धीरेंद्र कुमार रक्सौल यांच्या नेतृत्वाखाली रक्सौल पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज कुमार, जिल्हा गुप्तचर विभागाचे पुनी अखिलेश मिश्रा, ज्वाला सिंग, मिथलेश कुमार, रामगढवा पोलीस ठाण्याचे प्रभारी इंद्रजीत पासवान यांनी शोध मोहीम राबवली नाकाबंदी केली. दरम्यान हरियाणा पोलीस त्याला चौकशीसाठी रिमांडवर घेणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. तसेच पोलीस पथकातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.