Snake Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Snake Viral Video: बापरे बाप! बेडरुममध्ये आढळले ४ साप; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Snake Viral Video: जालंधरमध्ये राहणारे मुकेश कुमार यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या बेडरुमध्ये सापाची कातडी सापडली होती. मात्र काही दिवसानंतरच पुन्हा मुकेश यांना त्यांच्या बेडरुममध्ये चार साप आढळले.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video:

सापाचं नुसतं नाव ऐकलं तरी काळजात धडकी भरते. परिसरात झाडी असलेल्या ठिकाणी गावी हमखास साप अढळतात. अशता तुमच्या घरात जर एकाच वेळी ४ ते ५ साप निघाले तर. कल्पनाही करवत नाही अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एकाच घरात ४ ते ५ सापांना रेस्कू करण्यात आलंय.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंजाबमधील जालंधर येथे एका घरात चार साप आढळ्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. सर्पमित्रांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर सापांना घरातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

सापाचं प्रकरण नेमकं काय?

जालंधरमध्ये राहणारे मुकेश कुमार यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या बेडरुमध्ये सापाची कातडी सापडली होती. मात्र काही दिवसानंतरच पुन्हा मुकेश यांना त्यांच्या बेडरुममध्ये चार साप आढळले. साप आढळल्यानंतर तात्काळ सर्वमित्रांना बोलवण्यात आले. घरात तब्बल चार साप आढळून आल्याने कुंटुबियांचा थरकापच उडाला. तसेच कोणालाही यात इजा झाली नाही.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटर्फामवरील @Punjabibulletin या एक्स( ट्वीटर) अकाउंटवरुन शेअर करण्यात आलाय. व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळत आहेत तसेच नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सोशल मीडियावर रोज विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये बरेच सापाचे व्हिडिओही असतात. साप म्हटल्यावर भल्या भल्यांना पळता भुई कमी पडते. अशात किंग कोब्रा साप किंवा नाग म्हणजे सर्वात विषारी साप. असे असले तरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक माथेफेरू व्यक्ती सापांचा खेळ करतात. धाडस दाखवत सापांना किस करतानाचे देखील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आजवर व्हायरल झालेत. मात्र साप आढळल्यास घाबरून न जाता सर्पमित्रांना बोलावून त्यांना रेस्कू करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :पोस्टल मतमोजणी संपली, बारामतीतून युगेंद्र पवार आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT