ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना सुरू आहे. हा डेव्हिड वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे. दरम्यान हा सामना सुरू असतानाच डेव्हिड वॉर्नरने आपल्या फॅन्सला गुड न्यूज दिली आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्याने हरवलेली बॅगी ग्रीन कॅप परत मिळाली असल्याची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या सुरवातीलाच त्याने ही गुड न्यूज दिली. त्याने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत ही गुड न्यूज दिली. तसेच ही कॅप शोधण्यात मदत करणाऱ्यांचे त्याने आभार देखील मानले आहेत.
डेव्हिड वॉर्नरने व्हिडिओ शेअर करत म्हटले की, ' सर्वांना माझा नमस्कार.. मला सांगताना अतिशय आनंद होतोय की, माझी हरवलेली बॅगी ग्रीन कॅप मला सापडली आहे. प्रत्येक क्रिकेटपटूला याची जाणीव असेल की, ही कॅप किती महत्वाची आहे. ही कॅप मी आयुष्यभर सांभाळून ठेवणार आहे. ही कॅप शोधण्यात मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. गेल्या काही दिवसांपासून माझ्या खांद्यावर जे ओझं होतं ते हलकं झाल्यासारखं वाटतंय. सर्वांचे आभार..' (Latest sports updates)
प्रत्येक क्रिकेटपटूला आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात बॅगी कॅप दिली जाते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या बॅगमध्ये त्याने हे सामान ठेवलं होतं, ती बॅग सिडनीच्या एका हॉटेलमध्ये असल्याचं आढळून आलं. मात्र त्यांना ही बॅग कशी सापडली हे अजूनही कळू शकलेलं नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.