गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं, की तरुणांची तुफान गर्दी होते. लहानग्यापासून ते मोठ्यांपर्यंत गौतमीचा डान्स पाहण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ देखील निर्माण होतो. प्रेक्षकांना आवरताना पोलिसांच्या अक्षरश: नाकी नऊ येतात. सोमवारी तर हद्दच झाली. नवी मुंबईतल्या कामोठे परिसरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (Latest Marathi News)
या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी गर्दी केली. मात्र, कार्यक्रम ऐन जोमात असताना गर्दीत एक साप शिरला. या सापाला पाहून नागरिकांची धावपळ उडाली. त्यामुळे काही काळ कार्यक्रम रोखण्यात आला होता. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
गौतमी पाटील (Gautami Patil) अल्पावधीत संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाली आहे. तिने आपल्या डान्सने तरुणांना वेडपिसं करुन टाकलंय. राज्यात कुठेही गौतमीचा कार्यक्रम असला, तर तरुण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. सोमवारी नवी मुंबईतील कामोठे परिसरात गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नेहमीप्रमाणे तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली. मात्र, या गर्दीला आवरताना पोलिसांची मोठी दमछाक झाली. त्यातच ऐन गर्दी साप शिरल्याने अनेकांची पळापळ झाली. कार्यक्रम रंगात असतांना अचानक एका सापाने एन्ट्री घेतली आणि नागरिकांचा गोंधळ उडाला. प्रेक्षकांची घाबरगुंडी उडल्याने नागरिक पळू लागले.
दरम्यान, एका सर्पमित्राने साप पकडला. त्यामुळे अनर्थ टळला. मात्र, गौतमीच्या कार्यक्रमाची चक्क सापाला देखील भुरळ पडल्याची चर्चा कार्यक्रमात होती.शेवटी सर्पमित्रांनी या सापाला रेस्कू केलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या काही तरुणांनी धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळाले. काहींनी तर कार्यक्रमातील खुर्च्यांची तोडफोड देखील केल्याची देखील माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.