FACT CHECK: CAN A FAKE SIR MESSAGE EMPTY YOUR BANK ACCOUNT? saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: SIRचा मेसेज करेल बँक खातं रिकामं? लिंक उघडून पाहताच खात्यातून पैसे गायब?

SIR Scam Alert Fact Check: SIRच्या नावाने मतदार यादीतून नाव वगळल्याचा मेसेज आणि लिंक पाठवून बँक खाते रिकामे केले जात असल्याचा दावा व्हायरल आहे. या दाव्यात किती तथ्य आहे? जाणून घ्या सत्य.

Sandeep Chavan

  • SIRच्या नावाने मतदार यादीतून नाव वगळल्याचा मेसेज आणि लिंक पाठवली जाते.

  • अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यास फिशिंग आणि सायबर फसवणुकीचा धोका

  • SIR किंवा मतदार यादीशी संबंधित माहिती नेहमी अधिकृत निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून तपासावी.

.व्हायरल सत्य-असत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. तुम्हाला जर कुणी SIRबाबत फोन केला तर सावध व्हा. कारण, तुमचं नाव मतदार यादीतून वगळलंय असा मेसेज आणि लिंकही पाठवली जाऊ शकते.अशा प्रकारे लिंक पाठवून फसवणूक केली जातेय असा दावा करण्यात आलाय पण, या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

अधिकारी असल्याचा फोन केला जातो.मतदार यादीतून तुमचं नाव गहाळ होऊ नये, यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल सांगितलं जातं.APK फाईल डाऊनलोड करायला सांगून फसवणूक केली जाते. अशा प्रकारे फसवलं जातं, असा दावा कोल्हापुरातील एका डॉक्टरांनी केलाय. त्यामुळे खरंच अशा प्रकारे फसवणूक केली जातेय का?

सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून तुम्ही भरलेल्या SIR फॉर्ममध्ये त्रुटी आहे”, असं सांगितलं जातंय का? याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी डॉ. जयंत वाटवेंचीच भेट घेतली.आणि खरंच काय घडलं हे त्यांच्याकडून जाणून घेतलं. जयंत वाटवेंची फसवणूक झाली. त्यांचे 85 हजार रुपये काढून घेतले.आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य

SIRच्या नावाने APK फाईल पाठवून फसवणूक करतात

SIRच्या नावाने फोन आल्यास आधी खात्री करा

कुणीही लिंक पाठवल्यास उघडून व्यवहार करू नका

APK फाईल पाठवल्यास डाऊनलोड करू नका

SIR च्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा नवा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या किंवा कोणत्याही सरकारी प्रक्रियेच्या नावाने APK फाईल आल्यास त्वरित सतर्क व्हा. आमच्या पडताळणीत SIR च्या नावाखाली आलेला मेसेज बँक खातं रिकामी करू शकतं हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर महानगर पालिकेने हर घर तिरंगा मोहिमेसाठी खरेदी केलेल्या तिरंग्याचा खर्च अवाढव्य

रिक्षावाल्या भैयाची आजपासून परीक्षा! मराठी आलीच पाहिजे, नाहीतर परवाना कायमचा विसरा; काय आहेत नवे नियम

सावधान, हिमालय विरघळतोय! कोट्यवधी लोकांचा जीव धोक्यात, शास्त्रज्ञांचा इशारा

शिवसेना सुनावणीनंतर राजकीय समीकरण बदलणार? ठाकरे गटाची पक्ष चिन्हाबद्दल पर्यायी मागणी काय?

Mahayuti Clash: महायुतीत दोस्तीत कुस्ती; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यात कोंडी?

SCROLL FOR NEXT