Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ठार वेडेपणा! एका रील्ससाठी धावत्या एक्स्प्रेससमोर झोपला अन्...; व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल

Stunt Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्व माध्यमातून नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

Tanvi Pol

Shocking Stunt Video: रील्स म्हणजे प्रसिद्ध होण्यासाठी असलेले सर्वात जलद मार्ग असे सध्या काही तरुणाईला वाटते.काही दिवसांच्या प्रसिद्धीसाठी काही तरुण नको त्या थराला आणि मार्गाचा वापर करतात,सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे.जो पाहिल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.ज्यात एका तरुणाने रील्ससाठी चक्क धावत्या ट्रेनच्या खाली झोपण्याचे धाडस केलेले आहे.नक्की प्रकरण तरी काय ते एकदा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल.

नेमके व्हिडिओत घडले तरी काय?

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओत दिसत असलेल्या परिसरात रेल्वे रुळ दिसत आहे. ज्या रेल्वे रुळाच्या बाजूला एक तरुण उभा आहे.सुरुवातीस तरुण काय करणार आहे याची जराही कल्पना येत नाही.मात्र तरुणासोबत असलेला तरुण व्हिडिओ शूट करण्यास सुरुवात करतो आणि जो रेल्वे रुळाच्या बाजूला असलेला तरुण थेट रेल्वे रुळाच्या मधे जाऊन पोटाच्या बाजून झोपून जातो.तरुण झोपतो तेव्हाही काही समजत नाही,पंरतू तरुण झोपल्यानंतर काही क्षणात भरधाव वेगात एक एक्सप्रेस ट्रेनच्या तरुणाच्या वरुन जाते.त्यानंतर समजते की सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुणाने हा धोकादायक स्टंट केला आहे.

सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमक्या कोणत्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या इन्स्टाग्रा या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ पाहण्यात येत असून इन्स्टाच्या 'mr_deepak_raj_135dk'या अकाउंटवर तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र चांगलाच व्हायरल झालेला आहे.

नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया...

तरुणाचा व्हिडिओ(Video) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे,त्यानंतर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक नेटकऱ्यांनी आपली मते कमेटबॉक्ममध्ये दिलेली आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''बांबूनी फटके देयला पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''पोलिसांना तर जबर हाणायला पाहिजे की परत उठायला नको''अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : तरुणाच्या स्टंटबाजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

मुलांच्या संगोपनासाठी पुरूषांनाही 365 दिवस सुट्टी? महिला आयोगाची केंद्र सरकारकडे मोठी शिफारस

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; शिक्षणमंत्र्यांच्या गावातच ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT