Bike Stunt Video Viral: भयंकर! भररस्त्यात तरूणाची बाईकवर स्टंटबाजी, पोलिसांनी शिकवला चांगलाच धडा

Police Caught Bike Rider While Stunt: बिहार पोलिसांनी रस्त्यावर स्टंट करणाऱ्या तरूणावर कारवाई केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bike Stunt Video Viral
Bike Stunt Video ViralYandex

एक तरूण भररस्त्यात होत सोडून स्टंट करत दुचाकी चालवत असल्याचा व्हिडिओ (Bike Stunt Video Viral) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिहार पोलिसांनी रस्त्यावर स्टंट करणाऱ्या या तरूणाला चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी या तरूणाला पकडलं अन् त्याच्याकडील दुचाकी जप्त केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल लोकं काहीही करायला तयार असतात.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक तरूण आपले दोन्ही हात रस्त्यावर सोडून दुचाकी चालवत आहे. दुचाकीस्वाराच्या मागे पोलिसांची गाडीही धावताना दिसत आहे. मात्र, त्या तरूणाला काहीही फिकीर नाही. तो बेधडकपणे रस्त्याच्या मधोमध होत सोडून गाडी चालवत जीवाशी खेळत असल्याचं दिसत आहे. या स्टंट करणाऱ्या तरूणाचं नाव प्रशांत यादव (Police Caught Bike Rider While Stunt) आहे. तो बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती न्युज २४ हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला पकडलं आहे अन् त्याच्यावर कारवाई देखील केली गेली आहे.

हा व्हिडिओ बिहार पोलिसांनी त्यांच्या X अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बाईक जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 1 लाख लोकांनी पाहिला (Bike Stunt Video) आहे. त्याला हजारो लाईक्स मिळाल्याची देखील माहिती मिळत आहे. या तरूणावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरनंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Bike Stunt Video Viral
Viral Video: शाळेतील विद्यार्थ्यांची बीटबॉक्सिंगवर अनोखी जुगलबंदी; हुबेहूब आवाज काढत सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजकाल लोकं काहीही करायला तयार असतात. रस्त्यावर वाहन चालवताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कारण लहानशा निष्काळजीपणामुळे देखील मोठा अपघात होऊ (Viral Video News) शकतो. रस्त्यावर धोकादायक स्टंट करणाऱ्या अनेक व्यक्तींचे व्हिडिओ आजवर व्हायरल झाले आहेत. अनेकदा अशा घटनांमध्ये मृत्यू झाल्याचं देखील समोर आलं आहे. आताही असाच एक धोकादायक स्टंट करणाऱ्या तरूणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. असे स्टंट करणाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी देखील नेटकऱ्यांकडून होत आहे.

Bike Stunt Video Viral
Viral Video : नाद करा पण यांचा कुठं; बस पकडण्यासाठी आजोबा थेट खिडकीतून आत शिरले, अनोखा जुगाड व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com