आपल्यापैकी प्रत्येकांनी अनेकदा सॅन्डवीच नक्कीच खाल्ले असणार. सॅन्डवीच असा पदार्थ आहे जो बाहेर गेल्यावर सहज खाण्यासाठी मिळतो किंवा घरीही सहज आणि कमी वेळेत बनणारा पदार्थ आहे. अनेक पालक आपल्या मुलांना सगळ्या पोष्टिक भाज्या सॅन्डवीजच्या मदतीने खाण्यासाठी देतात आणि लहान मुलं ही आवडणी हे सॅन्डवीच खातात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जर कोणाला सॅन्डवीच खाल्याने नोकरीवरून काढल्याचे ऐकले आहे का? मात्र सोशल मीडियावर अशीच एक घटनेची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,ज्यात एका कंपनीत कामावर असलेल्या महिलेने उरलेले सॅन्डवीच खाल्ले आहे. चला तर मग पाहूयात नक्की प्रकरण तरी काय?
मिळालेल्या माहितीवरुन आपल्याला समजते की, ज्या महिलेला नोकरीवरुन काढल ती महिला लंडनमधील एका मोठ्या कंपनीत क्लिनर म्हणून साधारण २ वर्षांपासून कामाला होती. मात्र ख्रिसमच्या दिवसामध्ये त्या कंपनीत एका कार्यक्रम होता त्यावेळी तिथे काही वकिल हे पाहूणे म्हणून आले होते.
तेव्हा या वकिलांना खाण्यासाठी कंपनीने काही सॅन्डवीच मागविले होते. त्याचवेळी वकिलांनी खाल्यानंतर जे सॅन्डवीच उरले होते तेच क्लिनर महिलेने खाल्ले. त्यानंतर तिला कामावरुन काढण्यात आले.या घटनेनंतर तेथिल काही संघटनेने कंपनीविरोधात मार्चा काढत या घटनेचा विरोध दर्शवला होता. मात्र या सॅन्डवीची किंमत फक्त १५६.९१ रूपये होती.
या घटनेची पोस्ट व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांनी कंपनी विरोधात संताप व्यक्त केला आहे.काही यूजरने म्हटले आहे की,'एवढी छोटी मानसिकता आहे या कंपनीची' तर काही अन्य यूजरनी म्हटले आहे की,'आशा कंपनीवर कारवाई कठोर कारवाई करण्यात यावी'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.