Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: ट्रेनच्या बाहेर वाकला अन् थोडक्यात जीव वाचला; तरुण नव्हे, तर काकांनीच केला थरारक स्टंट

Viral Stunt Video patna: सध्या सर्वत्र एका धक्कादायक स्टंटची चर्चा जोरदार होत आहे. व्हायरल होत असलेल्या या स्टंटचा प्रकार व्हिडिओच्या मार्फत पाहण्यासाठी मिळत आहे. नक्की काय घडले ते एकदा तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Indian Uncles Railway Stunt: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आहे. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना दरवाजातून बाहेर वाकणाऱ्या व्यक्तींचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. मात्र, यावेळी वेगळं म्हणजे हा स्टंट एखाद्या तरुणाने नाही, तर वयाने मोठ्या असलेल्या एका काकांनी केला आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे येत आहेत.

काकांनी नेमकं केलं तरी काय?

या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं की, एक व्यक्ती धावत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ लटकून उभा आहे. ट्रेन वेगात धावत असतानाच हे काका दरवाजातून बाहेर वाकतात अन् काही वेळासाठी पूर्ण शरीरच ट्रेनच्या बाहेर झोकून देतात. सर्व थरारक स्टंट (Stunt) करताना असं वाटतं कधी त्यांचा तोल जाईल. मात्र, अवघ्या काही क्षणात बाहेर असलेल्या खांबाला त्यांची जोरदार टक्कर होते. सुदैवाने रेल्वेचा वेग जास्त नसल्याने मोठी दुखापत झालेली नाही.

घटना घडली तरी कुठे?

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील monalisa___fans या अकाउंटवर दोन दिवसांपूर्वी अपलोड केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''दानापूरहून पटणा जंक्शनला जात असताना, ट्रेनच्या बाहेर लटकलेला हा व्यक्ती विजेच्या खांबावर आदळला'' असे लिहिले आहे''. यामुळे ही घटना पटना येथील असल्याचे समजत आहे.

स्टंट व्हिडिओ(Video) त्या शहरापूर्ती चर्चेत न राहता सध्या देशभर व्हायरल झालेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला हजारो लाईक्स नेटकऱ्यांनी दिलेले आहेत तर शेकडो व्ह्यूज मिळत आहेत. ऐवढेच नाही तर एक यूजरने कमेंट केली,''कशाला वाचला'' अशा संतापजनक तर काहींनी ,''पोलिसांनी चांगलच फोडलं पाहिजे'' अशा रागीट भाषेत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT