Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: मित्रांसोबत मजा करायला गेला, पण परतलाच नाही! राफ्टिंग करताना नदीत बुडून युवकाचा मृत्यू

Rishikesh Rafting Accident: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तुम्हीही व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Rishikesh News: ऋषिकेशमधील नदीवर मित्रांसोबत राफ्टिंग करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नदीच्या वेगवान प्रवाहात पडल्यानंतर तरुण बेपत्ता झाला होता. मात्र, अनेक शोधमोहीम राबवल्यानंतर अखेर त्याचा मृतदेह सापडला आहे. घडलेल्या या घटनेमुळे पर्यटकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर संपूर्ण घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

थरार कॅमेऱ्यात कैद

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला नदीच्या प्रवाहात काही पर्यटक बोटवर बसलेले आहेत आणि नदीत राफ्टिंगचा आनंद घेत आहेत. राफ्टिंग करणाऱ्या प्रत्येकाने लाइफ जॅकेटही घातलेले आहेत. मात्र, काही क्षणाचा आनंद अत्यंत धक्कादायक(Shocking) घटनेत बदलतो. सर्व धक्कादायक घटना एका पर्यटकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

मित्रांच्या डोळ्यांदेखत घडली घटना

नदीत राफ्टिंग करत असतान पाण्याच्या प्रवाहाची तीव्रताही जास्त होती, अशातच राफ्टिंग करत असताना एक पर्यटक बोटीतून पाण्याच्या प्रवाहात पडतो. परंतू, पाण्याच्या प्रवाहाची तीव्रता इतकी जास्त असते की, तो पर्यटक खाली पडताच काही क्षणांतच दिसेनासा झाला.

या घटनेत मृत्यू झालेला तरुण देहरादूनचा रहिवासी असल्याचे समजते. सध्या या घटनेचा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रामवरील devbhoomi.live या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ही घटना पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक यूजरने कमेंट केली,''असं झालं तर जायचं की नाही मग'' दुसऱ्या यूजरने कमेंट्स केली,''खूप वाईट झाले'' अशा हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: घडलेल्या अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT