Stunt Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Stunt Video: रील्ससाठी धावत्या बाईकवर स्टंटबाजी; तरुणीचा अजब कारनामा पाहून नेटकऱ्यांचा संताप

Bike stunt video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि व्हिडिओत पुढे काय घडते ते पाहा.

Tanvi Pol

Dangerous stunt: गेल्या काही वर्षापासून स्टंटबाजी करण्याचे तरुणाईला जणू वेड लागले आहे. नुकताच एका तरुणीचा धावत्या बाईकवर स्टंट करतानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर टीका केली असून, काहींनी संबंधित तरुणीवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.

स्टंटबाजी पाहून थरकाप उडेल

व्हिडिओच्या सुरुवातीस तुम्हाला एक तरुणी दिसत आहे. जी तिच्या कॅमेऱ्यात व्हिडिओ शूट करत असते. धक्कादायक गोष्ट म्हणजे, तरुणी व्हिडिओ शुट करत असताना धावत्या बाईकवर उभी आहे आणि धोकादायक स्टंटबाजी(Stunt) करत आहे. हा प्रकार रस्त्यावर सुरू असताना इतर वाहनधारकही आश्चर्याने तिच्याकडे पाहताना दिसतात. जीवाची पर्वा न करता तरुणी हा स्टंट करत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ

हा व्हिडिओ एक्सवरील @rareindianclips या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून फेसबूक आणि अन्य माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजले नाही. मात्र, या व्हिडिओतील तरुणीचा कारनामा पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

व्हिडिओला (Video) अनेक लाईक्स आणि लोखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहे. शिवाय अनेक संतापजन प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले,''कडक कारवाई करा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,'' पोलिसांची भिती कशी काय वाटतं नाही यांना'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या पाहू शकता.

टीप: तरुणीचा हा स्टंट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT