Viral Train Accident Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: मैत्रिणी रेल्वे ट्रॅकवर उभ्या राहून सेल्फी घेत होत्या; भरधाव वेगात ट्रेन आली अन्...पुढे काय घडलं?

Viral Train Accident Video: सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना सोशल मीडियाचे भंयकर वेड लागले आहे. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात तिलाही सेल्फीच्या नादात जीव गमवावा लागला असता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Woman Viral Video

सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना सोशल मीडियाचे भंयकर वेड लागले आहे. कुठेही गेलो तरी त्या क्षणाचा आनंद घेण्यापेक्षा मोबाईलमध्ये तो क्षण टिपण्यात सर्वांचा कल असतो. अनेकवेळा आपल्यालाही सेल्फी घेण्याचा मोह टाळता येत नाही.

सेल्फी आणि रील्समुळे लोक स्वतःची काळजी घेणे विसरतात आणि अपघातांना बळी पडतात. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात तिलाही सेल्फीच्या नादात जीव गमवावा लागला असता. महिलेचा व्हिडिओ पाहून आपल्या अगांवर शहारे नक्कीच येतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढे काय झालं?

व्हायरल व्हिडिओत आपल्याला काही महिलांचा ग्रुप एका रेल्वे ट्रॅकवर उभा आहे. ज्यात त्या रेल्वे ट्रॅकवर उभे राहून आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत आहेत. सर्व महिला खुप आनंदात दिसत आहेत. रेल्वे ट्रॅकवर उभे असताना तिथून येणाऱ्या रेल्वेची वाट पाहत आहेत. जेणेकरून रेल्वे धावताना सेल्फी काढता यावा.

यावेळी रेल्वे ट्रॅकवर अचानक ट्रेन येते आणि महिलांच्या ग्रुपमधील एक महिला सेल्फीसाठी हात पुढे करून मोबाईलमध्ये पाहून थम करते, त्यामुळे भरधावत वेगात येणाऱ्या ट्रेनचा तिच्या हाताला धक्का लागल्यामुळे तिच्या हाताला दुखापत होते. मैत्रिणीला लागल्यानंतरही इतर महिला हसत होत्या आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत होत्या. त्यापैकी कोणाला ट्रेन अगदी ऐवढ्या जवळून जाऊन अपघात होईल याचा अदांज आला नसावा.

महिलांच्या ग्रुपच्या मस्तीचा व्हिडिओ एक्स (ट्वीटर) प्लॅटफॉर्मवरील @middlemanmediaa या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. समजलेल्या माहितीनूसार संबंधित व्हिडिओ तुर्कीतील आहे. या आधीही सेल्फीच्या नादात जीव गमवलेल्या व्यक्तींची संख्या जास्त आहे, तरीही प्रत्येवेळी लोकांना सागूंनही असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही.

व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून महिलावर संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने लिहिले की,'हे सगळे मूर्ख आहेत का?' तर आणखी एका यूजरने लिहिलं आहे की,'अशा लोकांवर पोलीस कारवाई करावी' व्हायरल व्हिडिओला हजारोंच्या घरात नेटकऱ्यांचे व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : वर्ध्यामध्ये शेतात संत्र्यांचा पडला सडा, ढगफुटी सदृश्य पावसामुळे अतोनात नुकसान

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT