Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नापास करण्याची धमकी, विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न, आरडाओरड केल्यानंतर शिक्षकाचा प्रताप उघड, जमावाने धूतले! पाहा VIDEO

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जो पाहून प्रत्येक नेटकऱ्यांचा संताप अनावर झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर सध्या उत्तर प्रदेशमधील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील महमुदाबाद शहरात एका शाळकरी विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षकाने परिक्षेत नापास होण्याची धमकी देत त्याच्या खोलीत नेल आणि विद्यार्थींनी सोबत अतिप्रसगांचा प्रयत्न केला आहे, मात्र विद्यार्थींनीने घाबरुन गोंधळ घातला. विद्यार्थींनीचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी येऊन तिची सुटका केली. त्यानंतर संतप्त नागरिकांनी शिक्षकांची बेदम धुलाई केली आहे. सध्या सोशल मीडियावर या मारहाणाची व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

नक्की काय घडले?

शाळकरी विद्यार्थींनी (students) सकाळी घराबाहेर अभ्यासासाठी पडली होती. त्यानंतर ती शाळेत जाणार होती, मात्र शाळेत न पोहचल्याचे समजताच मुलीच्या पालकांनी मुलीचा शोध घेण्यासाठी तात्काळ पोलिस स्टेशन गाठले आणि मुलीचा शोध (Search) सुरु झाला. दरम्यान काही वेळानंतर मुलीचा शोध लागला असता ती एका बंद खोलीत आढळून आली.

मात्र या मुलीला तिच्या शिक्षकाने नापास करण्याची धमकी देत जबरदस्तीने त्याच्या खोलीत नेले होते. मात्र मुलीने घाबरून आवाज केला असता आसपासच्या नागरिकांनी मुलीची सुटका केली दरम्यान मुलीचे पालकही तिथे पोहचले. आरोपी शिक्षक हा मुलीच्या शाळेतही शिक्षक (Teacher) होता आणि शिवाय तिच्या पालकांनी शाळेव्यतिरिक्त या शिक्षकाकडे मुलीला एका विषयासाठी शिकवणी लावली होती.

मुलीचे पालक तिथे पोहचल्यानंतर खोलीचा दरवाजा तोटून आरोपी शिक्षक आणि मुलीला सुखरुप सोडवून पालकांच्या ताब्यात दिले. मात्र संतप्त झालेल्या जमावाने शिक्षकाला जबर मारहाण केल्याचे व्हिडिओ दिसून येत आहे. या मारहाणीत आरोपी शिक्षकाला दुखापत झालेली आहे. मात्र त्यानंतर त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या आरोपीविरोद्धात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरु करण्यात आलेला आहे.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@Sachin Gupta'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते सांगण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT