Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: जीव एवढा स्वस्त! धावत्या ट्रेनमध्ये उभ राहून महिलेचा रील; व्हिडिओ पाहाताच नेटकरी म्हणाले...

Mumbai Local Train: सोशल मीडियावर दररोज अनेक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात एका महिलेचा धोकादायक ठिकाणी उभ राहून स्टंट करण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई लोकल अर्थात मुंबई करांची जीवन वाहिनी. सोशल मीडियावर दररोज मुंबई लोकलमधील अनेत किस्से आपल्याला पाहायला मिळतात तर कधी अनेकांनाकडून ऐकायला मिळतात.त्या लोकलमधील लेडीज कंपार्टमेंट असेल तर त्यात दररोज अनेक गोष्टी घडतात.सध्या सोशल मीडियावरही लेडीज कंपार्टमेंटमधील एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात एक महिला लेडीज कंपार्टमेंटमध्ये जीव धोक्यात घालून रील बनवत आहे.सध्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रील बनवणे हा प्रत्येकाचा आवडीचा छंद झालेला असल्याचे दिसून येत आहे. वेळ असो किंवा ठिकाण यामधील कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता फक्त रिल्स बनवत असतात.धोकादायक ठिकाणी रील बनवताना याआधी अनेकांना स्वता:चा जीव गमवावा लागला आहे.मात्र असे असून ही असे प्रकार थांबण्याचे नाव नाही.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओतही या महिलेने स्वता:चा जीव धोक्यात घालून रील(Reel) बनवला आहे.तुम्ही तर पाहा या महिनेने लोकल ट्रेनमध्ये कुठे रील बनवला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लोकल ट्रेनमधी(Local Train) असल्याचे दिसते. मात्र लोकलमधील व्हिडिओ हा लेडीज कंपार्टमेंटमधील आहे. ज्यात अनेक महिला लेडीज कंपार्टमेंटच्या दरवाजाच्या दिशेने उभ्या आहेत तर काही महिला या बसलेल्या दिसून येत आहेत. अशातच एक महिला आहे जी दरवाज्याच्यामध्ये असलेल्या खांबाला पकडून उभी आहे.

मात्र दरवाज्यात उभी असताना ही महिला एका हातात मोबाईल (Mobile)पकडून धावत्या लोकलमध्ये रील बनवत आहे. व्हिडिओत तुम्ही नीट पाहिले तर समजेल,प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे,मात्र आधी जीवाची पर्वा न करता ही महिला फक्त सोशल मीडियावर काही लाईक्स आणि स्वता:च्या आनंदासाठी रील बनवत आहे. मात्र या महिलेचा लोकलमधील असलेल्या गर्दीने तोल गेला असताना तर जीवही गमवावा लागला असता.

प्रतिक्रिया

सध्या व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''इन्स्टाग्रामवरील @charkopmemes'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला असून कॅप्शनमध्ये''पूर्ण ट्रेन इम्‌बैरस्‍ट्‌ दिसतेय'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक लाईक्स आणि बरेच व्ह्यूज व्हिडिओला मिळताना दिसून येत आहेत. व्हिडिओ व्हायरल होण्यासोबत अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'काय गरज याची'तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

KDMC : केडीएमसीतील कंत्राटी कामगारांचे काम बंद; सुमित कंपनीत सामावून घेण्याची मागणी

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

SCROLL FOR NEXT