Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: बँकॉकमध्ये पत्त्यासारखी इमारत कोसळली; जीव मुठीत घेऊन लोकांची पळापळ; भयावह व्हिडिओ आला समोर

Thailand Myanmar Bangkok Earthquake: सोशल मीडियावर गेल्या काही वेळापासून धक्कादायक प्रसंगाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकॉक येथील आहे.

Tanvi Pol

Myanmar earthquake lates Video: म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकॉक जोरदार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली आहे. ज्यामुळे तिथे मोठा हाहाकार उडाला. भूकंपानंतर घाबरलेले नागरिक धावपळ करताना दिसले, तर अनेक इमारती शिवाय अनेक पूल कोसळल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये बँकॉकमधील बांधकाम सुरू असलेली गगनचुंबी इमारत कोसळताना दिसते. या भूकंपाचे धक्के थायलंडसह शेजारील देशांमध्येही जाणवले असून बचावकार्य सुरू आहे.

इमारती कोसळल्या, नागरिकांची जीवघेणी धावपळ

व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओत तुम्हाला, बॅंकॉकमधील एक इमारत दिसत आहे. काही क्षणात ही गगनचुंबी इमारत अक्षरश: पत्त्यासारखी कोसळताना दिसते. इमारत कोसळताच इमारतीच्या खाली असलेले नागरिक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहे. इमारत कोसळताच धुराचे लोट इतरे भयावह आहेत की प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडेल. सर्व धक्कादायक प्रकार नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

म्यानमार आणि थायलंडची राजधानी बँकॉक येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.७ नोंदवली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंगू म्यानमार असल्याचे सांगितले जात असून झालेल्या या आपत्तीमूळे मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झालेली असल्याचे समजत आहे. सध्या सोशल मीडियावर भूकंपाच्या परिस्थितीचे थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

हा व्हिडिओ आणि या सर्व घटनेचे सर्व व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. सर्व व्हिडिओ एक्सच्या @BreakingAvian या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या भूकंपाचे (earthquake) हादरे भारतातील अनेक राज्यांतही बसले आहेत. मात्र, त्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT