Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : वाघोबालाही पडली रिसॉर्टची भुरळ, जंगलाच्या राजाला पाहून लोकांची उडाली घाबरगुंडी; थरकाप उडवणारा VIDEO

Shocking Video : वाघाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय, ज्यात एक वाघ चक्क रिसोर्टमध्ये झोपलेला दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video News : वाघ , साप ,हत्ती असे महाकाय आणि हिंसक प्राण्याचे नाव जरी ऐकले तरी प्रत्येकाला भिती वाटते. या प्राण्याचा वावर जंगलात आपल्याला पाहायल मिळतो. मात्र सध्या सर्व प्राणी आपल्याला प्राणी संग्रहालयात पाहायला मिळतात.त्यासाठी अनेकजण आपल्या मुलांना घेऊन प्राणी संग्रहालयात जातात. मात्र तुम्ही कधी विचार केला का तुम्ही सुट्टीसाठी रिसॉर्टमध्ये गेलात आणि तुमच्यासमोर वाघ येऊन बसला, असे झाले तर? सध्या असाच एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर आपल्याला अनेक प्राण्याचे व्हिडिओ पाहायल मिळतात.त्यात कधी भर रस्त्यात बिबट्यांचा मुक्त संचार पाहायल मिळतो,तर कधी मुख्य रस्त्यावर महाकाय हत्ती आल्याचे व्हिडिओ आपण पाहिले आहेत.तर कधी घरात तर कधी घरातील परिसरात साप आल्याचे थरारक व्हिडिओ पाहिले आहेत,मात्र सध्या व्हायरल होत असलेला वाघाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होत आहे,ज्यात एक वाघ चक्क रिसॉर्टमध्ये येऊन झोपल्याचे दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील रिसॉर्टचा आहे,हे समजू शकलेले नाही.मात्र व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत रिसॉर्टचा परिसर दिसून येत आहे.या रिसॉर्टमध्ये एका जागेत झाडाखाली असलेल्या सावलीत एक वाघ झोपलेला दिसून येत आहे.संपूर्ण व्हिडिओ रिसॉर्टमधील (Resort)एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

वाघाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील''@saamtv''या अकाउटवर आपल्याला पाहता येऊ शकतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले ,''वाघ वामकुशी घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल'' असं लिहिले आहे. व्हिडिओ पाहिल्यांनतर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत शिवाय अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''वाघाला तरी शांत झोपू द्या रे'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''भाऊ सुट्ट्यांवर आले आहे जोपु द्या की निवांत''.अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडिओला(Video) पाहून मिळत आहेत.

टीप-सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT