आपल्यापैंकी प्रत्येकजण सापाला नक्कीच घाबरत असणार. अनेकांनी फक्त टीव्हीमध्ये किंवा कोणत्या व्हिडिओत सापाला पाहिले असेल, मात्र सापाला फक्त व्हिडिओमध्ये पाहूनच प्रत्येकाला भिती वाटते. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ साप चक्क विद्यार्थ्यांच्या भेटीस गेलेला आहे. मात्र सापाने भरवर्गात केलेल्या एन्ट्रीने विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या पाया खालची जमिन पूर्णपणे सरकवली आहे. नक्की काय झाले ते तुम्ही खाली असलेल्या व्हिडिओत पाहा.
व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला एक क्लासरुम दिसत असेल. या क्लासरुममध्ये अनेक विद्यार्थी आहेत जे बेंचवर बसलेले आहेत शिवाय या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक शिक्षक आहेत, जे विद्यार्थ्यांच्या समोर एका ब्लॅकबोर्डच्या समोर आहे. क्लासरुमही अत्यंत मोठा आणि एसी असलेला दिसून येतो. मात्र क्लासरुमधील व्हिडिओ तुम्ही नीट पाहिला तर दिसेल की, या क्लासरुमधील एका एसीच्या बॉक्समधून सापाने बाहेर माण काढत त्याचा फणा काढलेला आहे. भरवर्गात आलेल्या अशा सापाने (Snake) विद्यार्थ्यांसह शिक्षकही पूर्णपणे घाबरुन गेलेले दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओ क्लासरुमधील एका विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये पटकन कैद केलेला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''@AaquilJameel'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओच्या कॅप्शनमधून व्हिडिओ कुठला आहे हेही समजत आहे. जे की, ''नोएडा येथील ॲमिटी युनिव्हर्सिटीच्या लेक्चर हॉलमध्ये एका सापाने अनपेक्षितपणे दर्शन दिल्याने विद्यार्थी हादरले'',असे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेले आहे.
व्हिडिओ एका दिवसापूर्वी असल्याचा समजत असून आतापर्यंत व्हिडिओला हजारांच्या घरात लाईक्स आणि मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहे. इतकेत नाही तर नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेट्सबॉक्समध्ये लिहिले आहे की,'' बाबो काय हे'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'' साप बाबा कुठेही जातो'' तर अनेक नेटकऱ्यांनी गंमतशीर तर अनेकांनी आश्चर्यकारक अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.