एलपीजी सिलेंडर स्फोट अनेकदा जीवितहानी होत असते. त्यामुळे सिलेंडर वापरताना काळजी घेण्याचा आणि दर आठवड्याला किंवा दहा दिवसांनी ते तपासण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामध्ये गॅस गळती झाल्यास किंवा रेग्युलेटरमध्ये आग लागल्यास काय करावे हे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्ष घटनेत लोक घाबरतात आणि योग्य पावले उचलण्याऐवजी चुकी करतात. असाच प्रकार व्हायरल झालेल्या महिलेने केलाय. सिलेंडरमधील गॅस गळती होत असताना महिलेने चुकी केलं अन् अनर्थ घडला.
सिलेंडरच्या स्फोटाचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये सिलेंडरमधून गॅसची गळती होताना दिसतेय. घरातील एक महिला सिलेंडर घराबाहेर नेण्याचा प्रयत्न करते. पण घाबरून ती महिला सिलेंडर तसाच सोडून देते. सिलेंडर खाली पडतो आणि गॅस पाईपमधून गॅस बाहेर पडताना व्हिडिओमध्ये दिसतंय.
नंतर सिलेंडरमधील सर्व गॅस बाहेर फेकला जातो. संपूर्ण घरात गॅस पसलेला असतो, त्यावेळी पती-पत्नी आरामात घरात येतात आणि सिलेंडरचा रेग्युलेटर तपासतात. त्याचदरम्यान स्वयंपाकघरात मोठा स्फोट होतो आणि आग संपूर्ण घरात पसरते.
सुदैवाने दोघेही घराबाहेर पडतात. दरम्यान हा व्हिडिओ कुठला आहे आणि ही घटना कधी घडली याबद्दल कोणतीही माहिती नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध कमेंट करत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी स्वयंपाक केल्यानंतर गॅस रेग्युलेटर बंद करण्याचा आणि सिलेंडर नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरची देखील एक्सपायरी डेट असते.गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट चेक करून घेणं गरजेचे आहे. नाही तर ते धोकादायक ठरू शकते. गॅस सिलेंडर जास्त काळ उच्च दाबाखाली गॅस साठवून ठेवतो. कालांतराने सिलेंडरचा धातू कमकुवत होतो.सिलेंडरचा धातू कमकुवत झाल्यावर गळत होणे किंवा फुटण्याचा धोका असतो. गॅस सिलेंडरच्या वरच्या बाजूला एक्सपायरी डेट लिहिलेली असते. ती A, B, C, D या इंग्रजी अक्षरात असते.
A, B, C, D या अक्षरांपुढे शेवटी दोन अंकी संख्या लिहिली जाते. हा कोड सिलिंडरच्या चाचणी आणि एक्सपायरीबद्दल माहिती देणारा असतो. A अक्षर म्हणजे या सिलेंडरची एक्सपायरी जानेवारी-मार्चपर्यंत आहे. B अक्षर म्हणजे या सिलिंडरची एक्सपायरी एप्रिल-जूनपर्यंत आहे. C अक्षर म्हणजे या सिलेंडरची एक्सपायरी जुलै-सप्टेंबरपर्यंत आहे. D अक्षर म्हणजे या सिलेंडरची एक्सपायरी ऑक्टोबर-डिसेंबरपर्यंत आहे. जर सिलेंडरवर C-25 लिहिले असेल तर याचा अर्थ या सिलेंडरची एक्सपायरी डेट जुलै ते सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.