Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: फिरता फिरता आकाशपाळणा अडकला, लोक हवेत लटकत राहिले अन्... थरकाप उडवणारा VIDEO

Viral Video: अचानक हा पाळणा हवेत असतानाच लॉक होतो. ज्यामुळे अनेक लोक उलटे लटकत राहतात. तर काही जण खाली कोसळतात.

Gangappa Pujari

Viral Video News:

लहानपणी जत्रेत फिरताना गगनचुंबी पाळणे बघायची, त्यामध्ये बसायची इच्छा तुम्हालाही झाली असेल. अनेकांनी लहानपणी आकाश पाळण्यात बसण्याची मजा लुटली असेल. अलिकडच्या काळात आधुनिक पद्धतीचे भलेमोठे पाळणे आले. जे अनेक पार्क, जत्रा किंवा सण- समारंभात पाहायला मिळतात. अशा पाळण्यात बसणे अनेकदा धोक्याचेही ठरु शकते. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका पाळण्याच्या दुर्घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. काही लोक पार्कमध्ये आनंदाने पाळण्यात बसण्याचा आनंद लुटत आहेत. मात्र पुढे असं काही घडतं ज्याचा कोणी विचारही केला नसेल. अचानक हा पाळणा हवेत असतानाच लॉक होतो.

ज्यामुळे अनेक लोक उलटे लटकत राहतात. तर काही जण खाली कोसळतात. हा थरकाप उडवणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवरुन (Instagram) शेअर करण्यात आला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी अशा विद्युत पाळण्यांमध्ये न बसण्याचाही सल्ला यावेळी दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, स्विंग हवेत सरळ वर पोहोचला आणि जमिनीपासून नव्वद अंशाच्या कोनात अडकला. त्यात प्रवास करणारे सर्व लोक हवेत उलटे लटकले राहिले. पाळणा मध्येच अडकल्यामुळे खाली असलेले लोकही चिंतेत पडल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही हादरुन गेले आहेत. अनेकांनी यापुढे अशा पाळण्यात न बसण्याचेही सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: नवरा कामाला गेला, समलिंगी पार्टनरसाठी आईकडून ५ महिन्यांच्या बाळाची हत्या; मृतदेहासोबत फोटो काढून पाठवले

Stray Dogs Issue: शाळा, कॉलेज रेल्वे स्थानक परिसरातील भटके कुत्रे हटवा; नसबंदी केलेल्यांना शेल्टर होममध्येच ठेवा, SC चे निर्देश

Jio, Airtel, Vi बजेट फ्रेंडली प्लॅन्स, ३ महिन्यांसाठी 'हे' आहेत परवडणारे रिचार्ज

Maharashtra Live News Update: पनवेल ते सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमधून तरुण पडला

Satpura Tourism: धुक्याने नटलेले सातपुडा; ‘विंटर वंडरलँड’ पाहण्यासाठी लोकांची उसळली गर्दी

SCROLL FOR NEXT