Anganwadi Workers Strike
Anganwadi Workers StrikeSaam Tv

Nashik News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर अंगणवाडी सेविकांचा गोंधळ, पोलिसांनी घेतलं ताब्यात; पाहा व्हिडिओ

Anganwadi Workers Strike: नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर आंगवडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी गोंधळ घातला.
Published on

Anganwadi Workers Strike:

नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर आंगवडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी गोंधळ घातला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या अंगणवाडी सेविकांना बोलवून घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या दोन अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे हे देखील नाशिकमध्ये आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Anganwadi Workers Strike
Maldives Underwater Meeting: मालदीवमध्ये समुद्राच्या खोल पाण्यात का झाली संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक?

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री शिंदे हे नाशिकमध्ये मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेत होते. त्यावेळी दोन अंगणवाडी सेविका त्यांच्यासमोर आल्या. त्यांनी टाहो फोडत मुख्यमंत्र्यांना आपल्या वेदना सांगण्यात प्रयत्न केला. याचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये या दोन्ही अंगणवाडी सेविका ढसाढसा रडत आपल्या मागणी मुख्यमंत्री शिंदेंना सांगताना दिसत आहे. (Latest Marathi News)

अंगणवाडी सेविकांनी गोधळ घाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलावून घेतलं. त्यांचं म्हणणं ऐकलं. यानंतर जेव्हा ते तिथून निघत होते, त्यावेळी पुन्हा या दोन अंगणवाडी सेविकांनी रडत त्यांना आपल्या मागण्या सांगण्यास सुरुवात केली. यात व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री तिथून निघत असताना एक अंगणवाडी सेविका रडत ओरडत म्हणाली की, ''साहेब आमच्या मागण्या मान्य करा. खूप दिवस झाले , आम्ही उपाशी आहोत.''

Anganwadi Workers Strike
Shinde VS Pawar: अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर? नेमकं कारण काय?

दरम्यान, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. शासनाने अद्याप अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत काेणताच निर्णय जाहीर केलेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com