Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: दुचाकीचा कट मारल्याच्या रागातून तरुणावर चाकू हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Ambernath Incident: अंबरनाथ शहरातील घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण आहे. असे काय घडले ते पाहा.

Tanvi Pol

अंबरनाथ शहरात एका किरकोळ कारणावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे आणि वाद इतका टोकाला गेला की शेवट अत्यंत धक्कादायक ठरतो. जिथे दुचाकीवरून जात असताना कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय.

नेमके घडले काय?

निकेत हा शुक्रवारी दुपारी कॅम्प ५ च्या दुर्गादेवी पाडा रस्त्यावरून जात असतो. दरम्यान समोरून आलेल्या तुषार उर्फ अण्णा नामक तरुणाच्या दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले आणि निकेत याने तुषारला मारहाण केली.

याच्या प्रत्युत्तरात तुषार याने कमरेला असलेला धारधार चाकू काढून निकेत याच्यावर वार केले. यात निकेतच्या पाठीवर आणि कमरेवर वार झाल्याने तो जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबरनाथच्या (Ambernath) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दहशतीचं वातावरण निर्माण

सर्व धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये (Cctv)कैद झाली असून सध्या याचा व्हिडिओ saamtvnews या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे आणि यावर लोकांनी विविध मते मांडली आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''या भागात गुन्हांच्या घटना वाढल्या आहेत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''धक्कादायक प्रकार आहे'' अशा प्रकारे हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

SCROLL FOR NEXT