Shocking CCTV Footage Saam Digital
व्हायरल न्यूज

Shocking CCTV Footage: जीममध्ये तरुण डंबेलसह तोंडघशी पडला; मित्रांच्या काळजाचा ठोका चुकला, पाहा VIDEO

Viral Video: नवीन वर्षाचे औचीत्य साधून प्रत्येकजण नवीन संकल्प ठरवत असतात. या संकल्पामध्ये अनेकजण शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी जीमला जाण्याचे ठरवतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Gym Video

नवीन वर्षाचे औचीत्य साधून प्रत्येकजण नवीन संकल्प ठरवत असतात. या संकल्पामध्ये अनेकजण शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी जीमला जाण्याचे ठरवतात. या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात एका तरुणाचा जीमचा पहिला दिवस शेवटचा ठरला असता. नक्की व्हिडिओत काय आहे पाहूयात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक भयंकर घटना तसेच थरारक अपघांताच्या घटना समोर येत असतात. बहुतेक धक्कादायक घटना सीसीटीव्हीमुळे आपल्याला बघायला मिळत असतात. अशातच व्हायरल होत असलेल्या तरुणाचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे.

व्हायरल व्हिडिओ एका जीमधील आहे. जीममध्ये अनेक तरुणही व्यायाम करताना आपल्याला दिसत आहेत. दरम्यान पिवळ्या रंगाची ट्रॅक पॅंट आणि सफेद रंगाचा टीशर्ट घातलेला तरुण हातात लहान आकाराचे डंबेल्स घेऊन जीममध्ये उभा आहे. काही वेळानंतर तरुण बेंचवर झोपून व्यायाम करायला जातो तेवढ्यात बेंच पुढचा भाग निसटतो आणि तरुण जोरात मानेवरुन पलटी मारुन खाली पडतो. मात्र नशीब चांगले म्हणून तरुणाच्या मानेला काही होत नाही. खाली पडल्यानंतर जीममधील इतर तरुण त्या मुलाला पकडण्यासाठी त्याच्याजवळ येतात.

एक्स प्लॅटफॉर्मवरील @HasnaZaruriHaiया अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की.'GYMमें पहला दिन'.यापूर्वीही जीममधील थरारक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत तसेच या घटनामध्ये अनेक वेळा व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे.

एक्स अॅपवरील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांकडून व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की,'दुसऱ्या आयुष्याचा पहिला दिवस' तर आणखी एका यूजरने लिहिले,' तो सोबत योगापण करत होता फक्त तुम्हाला समजले नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deputy Election Commissioner: निवडणूक आयोगात मोठा फेरबदल! IAS प्रकाश राजपुरोहित नवे उप निवडणूक आयुक्त

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

SCROLL FOR NEXT