साम टिव्ही ब्युरो
घरातील लोखंडी वस्तूंना गंज लागल्याचे अनेकदा तुम्ही पाहिले असेल.
पण रेल्वे ट्रॅक देखील लोखंडाचे बनलेले आहेत, शिवाय ते पाऊस, सूर्यप्रकाश सर्व सहन करतात पण गंजत नाहीत.
रेल्वे ट्रॅक्सना गंज का पडत नाही? या प्रश्नाचं उत्तर आज जाणून घेऊया.
लोह किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू ऑक्सिजन आणि आर्द्रतेच्या संपर्कात येतात तेव्हा त्या हळूहळू खराब होऊ लागतात.
सोबतच त्यांचा रंगही बदलतो, याला लोखंड गंजणे म्हणतात.
रुळावरील चाकांच्या घर्षण शक्तीमुळे गंज येत नाही असे अनेकांना वाटेल, पण तसे नाही.
रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी खास प्रकारचे स्टील वापरले जाते.
पोलाद आणि मिश्र धातु मिसळून ट्रेनचे ट्रॅक तयार केले जातात.
स्टील आणि मँगलोय यांच्या या मिश्रणाला मॅंगनीज स्टील म्हणतात. यामुळे ऑक्सिडेशन होत नाही आणि अनेक वर्षे ट्रॅक गंजत नाहीत.