Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अजब प्रकार! पनवेल परिसरात चोरटे रात्रीच्या अंधारात बैल घेऊन फरार; घटना CCTVमध्ये कैद

Animal Theft Video: सोशल मीडियावर सध्या एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नक्की कशाची चोरी झाली ते पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल.

Tanvi Pol

Bull Theft In Panvel: गेल्या वर्षभरात देशात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत.काही चोरीच्या घटना ऐकून प्रत्येकजण हैराण होते.त्यातच सध्या सोशल मीडियावर एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे,ज्यात चक्क एका चोराने दोन बैलांची चोरी केलेली आहे.

सोशल मीडियावर तुम्ही बाईक चोरी(Theft)ची घटना पाहिली असेल तर कधी सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना पाहिल्या आहेत.मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या दोन बैलाच्या चोरीची घटना अत्यंत वेगळी आहे.सध्या या चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.

पन्नास हजार रुपयांच्या दोन बैलांची चोरी केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अभिदास गायकर यांनी आपले दोन बैल केवाळे गावातील रस्त्याच्या कडेला बांधले होते. पहाटे पाच वाजता बैलगाडी घेऊन जाण्यासाठी गेले असता त्यांना त्यांची दोन्ही बैल बांधलेल्या ठिकाणी आढळून आली नाहीत.

शोध घेतल्यावर देखील बैल न मिळाल्याने ग्रामपंचायतने लावलेले सीसीटीव्ही तपासले असता बैलाच्या जवळ एक अनोळखी इसम वावरताना दिसला. त्यांनेच बैल चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस(Police) ठाण्यात तक्रार केली असता पोलीसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केलाय.

टीप: चोरीच्या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT