Boy seen dangerously lying between railway tracks to film a reel screen grab from the viral video Saam Tv
व्हायरल न्यूज

हद्द झाली! रीलसाठी पोरगा रेल्वेरुळांमध्ये झोपला; VIDEO व्हायरल

Railway Track Reel Video: सोशल मीडियासाठी प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी एका मुलाने रेल्वेरुळांमधील काँक्रिटच्या फटीत जाऊन झोपण्याचा धोकादायक प्रकार केला. हा थरकापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Tanvi Pol

Dangerous Stunt Video: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा चक्क धावत्या रेल्वेच्या रुळांमध्ये म्हणजेच रेल्वेरुळांखालील काँक्रिटच्या फटीमध्ये झोपलेला दिसतो. रील बनवण्यासाठी हा मुलगा इतका मोठा धोका पत्करतो की पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे येतात.

इंटरनेटच्या युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीजण कोणत्याही थराला जातात. या व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या मुलाने आपल्या शरीराला रेल्वे ट्रॅकच्या दोन रुळांमध्ये अडकवले आणि रुळाखालील स्पेसमध्ये झोपून राहिला. त्याच्या डोक्याच्या वरून, म्हणजे अगदी काही इंच अंतरावरून रेल्वेच्या डबा जातो. संपूर्ण व्हिडिओ(VIDOE) पाहताना एक वेळ तर वाटते की, हा मुलगा यातून जिवंत सुटणारच नाही. परंतु रेल्वे जाताच तो सहजतेने उठतो आणि आपल्याच कृत्यावर अभिमान बाळगत हसतो.

सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @TeluguScribe या एक्स सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड करताच नेटकरी वर्गातून संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही यूजर्संनी म्हटलं,''पालकांनी चागंलच चोपल पाहिजे'' तर काहींनी हा व्हिडिओ पोलिसांना टॅग करत योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.

प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळ

आजकाल सहन बरेच तरुण- तरुणींना सोशल मीडियावर व्हायरल (VIRAL) व्हायचे वेड लागले आहे. रील्स, युट्यूब शॉर्ट्स यामुळे लोकप्रियतेसाठी लोक वेडेपणाच्या कडेलोटापर्यंत पोहोचत आहेत. हा व्हिडिओ त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. या मुलाल त्याच्या कृत्याचे गांभीर्य कदाचितच कळले नसावे. एखादी चूक झाली असती, थोडाही हिशोब चुकला असता तर त्याचा थेट मृत्यू झाला असता.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Temple : गणेशोत्सवात गणपती मंदिरातील दान पेटीची चोरी; चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Modak Aamti: गणेशोत्सवात गोडासोबत तिखट! घरीच बनवा झणझणीत मोदकांची आमटी, सोपी रेसिपी वाचा

Maharashtra Live News Update: पुण्यात ओबीसीचे महाघटांनाद आंदोलन, मराठा आरक्षण जीआर रद्द करण्याची मागणी

Maratha Reservation: कुणबी नोंद नसणाऱ्यांना हैदराबाद गॅझेटमुळे दिलासा; कोणत्या जिल्ह्यात किती नोंदी?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? भाजप नवीन जबाबदारी देण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT