viral news  Saam tv
व्हायरल न्यूज

Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

viral video news : ९८ टक्के भरलेल्या जायकवाडी धरणावर कारचालकाने स्टंटबाजी केली. कारचालकाचा थररार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डॉ. माधव सावरगावे

धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग

पाण्याखाली गेलेल्या पुलावर कारचालकाचा स्टंट

पोलिसांनी वाहतुकीस बंदी असतानाही कारचालकाची स्टंटबाजी

या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून मोठा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याचदरम्यान धरणाच्या पायथ्याशी असलेल्या दगडी पुलावरुन चारचाकी गाडी चालवत एका वाहनधारकाने स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जायकवाडी धरणातातील दगडी पुलावर जीव धोक्यात घालून कार चालवल्याचा शुक्रवारी प्रकार घडला.

जायकवाडी धरण हे ९८ टक्के भरलं आहे. धरणाच्या १८ दरवाजातून तब्बल ७५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पाण्यामुळे धरणाच्या पायथ्याशी असलेला दगडी पुल पाण्याखाली गेला आहे. या धरणातून प्रचंड वेगाने पाणी या पुलावरुन वाहत आहे. मात्र, पाणी वाहत असतानावाहनधारक चारचाकी वाहन या पुलावरुन चालवित नेत आहे.

पुलाच्या बाजूला असलेल्या जुने कावसन या गावाच्या मार्गावरुन पैठण शहराच्या दिशेने वाहन घेऊन तो येत आहे. दरम्यान, पोलिस आणि धरण प्रशासनाने या पुलावरुन वाहतूक करण्यास बंदी घातली आहे. याबाबतचा सूचनाचा फलक ही सुरक्षिततेसाठी लावला आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन करुन हा स्टंटबाजीचा प्रकार केला आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

मोबाईलच्या टॉवरवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा गावात शंकर माटे या तरुणाने मोबाईल टॉवरवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. उडी मारतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. तर अधिकचा तपास अहमदपूर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT