Jaipur Crime News Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking News: WiFi मुळे वाद , मुलाने आईला बेदम मारलं, बेशुद्ध पडली तरी थांबला नाही, माऊलीचा जागीच मृत्यू, धक्कादायक घटनेचा VIDEO

Jaipur Crime News: जयपूरच्या करधनी भागात मुलानेच आईचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर गंभीर मारहाणीत झाले.या हल्ल्यात संतोषी देवी यांचा मृत्यू झाला आहे.

Manasvi Choudhary

जयपूरच्या करधनी शहरात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आईचा जीव घेतला आहे. किरकोळ कारणावरून मुलाने आईला जबर मारहाण केली आहे यामध्येच आईचा जीव गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेले असून या मुलाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जयपूरच्या करधनी पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. अरूण विहार कॉलनीत राहणाऱ्या एका कुटुंबात आई आणि मुलामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारमारीत झाले असून यामध्ये आईला आपला जीव गमवावा लागला आहे.

सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीचं नाव नवीन सिंग असं आहे. आई संतोषी देवीशी त्याचं वाय- फाय कनेक्शनवरून भांडण झालं. आईने या मुलाला सिलिंडर आणण्यास सांगितलं होतं मात्र मुलगा ऐकायला तयार नव्हता. त्या दोघांच्यात कडाक्याचे भांडण सुरू झाले. संतापलेल्या मुलाने आईला मारहाण करण्यास सुरूवात केली.

वडील आईला वाचवण्यासाठी धावत आले असता मुलगा वडिलांना देखील घाबरला नाही. तो शांत झाला नाही. या गंभीर मारहाणीमध्ये आई संतोषी देवी या बेशुद्ध पडल्या. काहीवेळातच आजूबाजूच्यांना ही घटना समजली त्यांनी ताबडतोब संतोषी देवी यांना हॉस्पीटलमध्ये नेले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस दाखल झाले आहेत.या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sudden Weight Gain: कमी खाऊनही वजन वेगाने वाढतंय? या ५ गोष्टी असू शकतात कारणीभूत

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये युवकाचं अनोख आंदोलन, रिकामा सिलिंडर दिला फेकून

नाशिक कुंभमेळा होणार जगातील सर्वात भव्य! फडणवीसांनी मांडला ३५ हजार कोटींचा रोड मॅप

Mumbai : महिलांची छेड काढणाऱ्या 'सिरीयल मोलेस्टर'ला बेड्या, असा अडकला मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

Summer Saree Tips: उन्हाळ्यात कम्फर्टेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी या 5 रंगाच्या साड्या नेसा

SCROLL FOR NEXT