Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा; गंगापूरमध्ये भरदिवसा छेड आणि मारहाण; VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडिया एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये गंगापूरमध्ये भर दिवसा छेड आणि मारहाण झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Tanvi Pol

माधव सावरगावे,साम टिव्ही

Gangapur Shocking News: महाराष्ट्रातील गंगापूरमध्ये भर दिवसा छेड आणि मारहाण झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितांना शारीरिक त्रास आणि छेडखानीचा सामना करावा लागला, ज्यामुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांत नाराजी पसरली आहे शिवाय प्रशासनाकडून तत्परतेने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेचा तपास सुरू असून, पोलिस आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुलीची छेड काढण्याच्या कारणावरून जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची बातमी सर्वप्रथम साम टीव्हीने(Tv) दाखवल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीय. छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज MIDC परिसरातल्या जोगेश्वरीमध्ये घडलेल्या प्रकरणाची पोलिसांनी साम टीव्हीच्या बातमीनंतर गंभीर दखल घेतली.

जोगेश्वरी येथील १४ वर्षीय मुलगी, आई, वडील, भाऊ आणि बहिणीसह भाड्याच्या घरात राहतात. त्यातील नववीत शिकणारी १४ वर्षीय मुलगी शाळेतून घरी येत होती. त्यावेळी आरोपी निलेश दुबिले, ऋशिकेष दुबिले, प्रतीक राजुपत आणि रोहित राजपूत यांनी तीला अश्लिल हातवारे करीत तीचा पाठलाग करत असल्याचे तीने घरी आल्यानंतर सांगितले. याबद्दल ५ मार्च रोजी सायंकाळी आरोपीला विचारणा केली असता, चौघांनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने तसेच जे हातात येईल त्याने पीडित मुलीच्या आईला छातीवर लाथाने व डोक्यात मारून जखमी केले.

याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस(Police) ठाण्यात आरोपी निलेश दुबिले, ऋशिकेष दुबिले, प्रतीक राजुपत यांच्याविरुद्ध ६ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीची चौकशी करून नोटीस देऊन सोडण्यात आले. याबाबतची बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर पोलिसांनी तातडीने चार आरोपीला अटक करून कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘शिवसेना कोणाची?’ सुनावणी सुरू असतानाच शिंदेसेनेला मोठं बळ; बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 3 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

SCROLL FOR NEXT