Saam Tv
व्हायरल न्यूज

धक्कादायक! धावत्या रिक्षातून अचानक पडला विद्यार्थी; थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद

Student Falls From Rickshaw: जळगावच्या भुसावळमध्ये वळणावर चालत्या रिक्षातून एक विद्यार्थी रस्त्यावर फेकला गेला. चालकाला याची कल्पनाही नव्हती. अति वेग आणि रिक्षामधील विद्यार्थ्यांची गर्दी यामुळे अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.

Tanvi Pol

Shocking Viral Video: भुसावळ शहरात एक थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षामधून एक विद्यार्थी चक्क रिक्षाच्या बाहेर फेकला गेला. विशेष म्हणजे, या घटनेबाबत संबंधित रिक्षाचालक पूर्णपणे अनजान होता. विद्यार्थ्याला रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत पाहून पाठीमागून येणाऱ्या नागरिकांनी त्याला उचलले, मदत केली आणि धीरही दिला. सर्व घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

घटना नेमकी कशी घडली?

ही घटना भुसावळ शहरातील प्रमुख भागात घडली आहे. शाळकरी विद्यार्थी रोजप्रमाणे इतर मित्रांसोबत रिक्षामध्ये शाळेत जात होता. मात्र, रस्त्यावरुन रिक्षा जात असताना अचानक रिक्षामधून तो रस्त्यावर फेकला गेला. हे सगळं इतक्या वेगाने घडलं की विद्यार्थी कुठे गेला हे चालकाच्याही लक्षात आलं नाही

CCTV मध्ये कैद झाला थरार

ही संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या व्हिडिओ(Video) मध्ये स्पष्टपणे दिसते की, रिक्षातून जात असताना अचानक एक विद्यार्थी दारातून थेट रस्त्यावर पडतो. तो काही क्षण तसाच पडून राहतो. त्या दरम्यान पाठीमागून येणाऱ्या लोकांनी धाव घेत त्याला उचलले आणि रस्त्याच्या कडेला सुरक्षित नेले. या ठिकाणी असलेले गतिरोधक आणि अति वेगामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले असले तरी अतिरिक्त विद्यार्थी रिक्षामध्ये अक्षरशः कोंबले जात असल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पाठीमागून आलेल्या लोकांनी दाखवला माणुसकीचा हात

ज्या क्षणी विद्यार्थी रस्त्यावर पडला, त्यावेळी मागून येणाऱ्या काही नागरिकांनी प्रसंगावधान राखून रिक्षा थांबवली. त्यांनी तात्काळ विद्यार्थ्याला उचलले, पाणी दिलं आणि त्याला धीर दिला. काहींनी त्याच्या पालकांशी संपर्क साधला. ही माणुसकीची भावना खरंच वाखाणण्याजोगी होती

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT