Shocking incident happened in gujarat womans hairs stuck in ferris wheel ride video went viral Sharechat
व्हायरल न्यूज

Gujarat Viral Video: आकाश पाळण्याची हौस चांगलीच फीटली; पाळणा वर जाताच केस अडकले अन्; पुढे काय घडलं?

Womans Hairs Stuck In Ferris Wheel Ride: गुजरातमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.

Ankush Dhavre

Womans Hairs Stuck In Ferris Wheel Ride:

गावात किंवा शहरात यात्रा असली की, लोकं प्रचंड गर्दी करतात. विविध प्रकारचे पाळणे हे यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं. पाळणे दिसले की, लहान मुलांसह मोठ्यांनाही पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही.

तुम्हीही यात्रेत गेल्यानंतर एकदा तरी आकाश पाळण्यात बसलेच असाल, मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे विचार बदलू शकतात. काय आहे नेमका प्रकार? जाणून घ्या.

यात्रेत लांबून पाहिलं तरी उंच आभाळात गोल फिरत असलेला आकाश पाळणा स्पष्ट दिसतो. हा पाळणा पाहून कोणालाही त्यात बसण्याची इच्छा होते. मात्र आकाश पाळण्यात बसणं एका तरूणीला महागात पडलं आहे.

नुकताच एका यात्रेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तुम्ही पाहु शकता की, काही लोक आकाश पाळण्यात असलेल्या तरुणीचे केस कापताना दिसून येत आहेत.

या तरूणीचे केस स्विंगमध्ये अडकले आहेत. काही लोक वर जाऊन सुरीने तिचे केस कापताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest viral videos)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरातचा असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेली मुलगी आकाश पाळण्यात केस मोकळे सोडून बसली असावी. आकाश पाळण्यात एका पाठोपाठ एक सर्वजण बसले.

आकाश पाळणा सुरू झाला. २ फेऱ्या झाल्यानंतर अचानक ओरडण्याचा आवाज आला. आवाज येताच पाळणा थांबवण्यात आला. वर पाहिल्यानंतर लोकांना धक्काच बसला.

एका तरूणीचे केस झुल्यात अडकले होते. हे दिसताच पाळणा थांबवण्यात आला. दोन मुलं धावत वर चढली आणि त्यांनी चाकुच्या साहाय्याने तिचे केस कापले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

SCROLL FOR NEXT