Trending Viral Video: बसमधील प्रवास अनेकदा गडबडीतला आणि धावपळीचा असतो. प्रवाशांची गर्दी शिवाय उशीर आणि बसमधील मर्यादित जागा यामुळे अनेकदा किरकोळ वाद देखील मोठ्या भांडणात रूपांतरित होतात. सध्या असाच काहीसा धक्कादायक प्रकार एका एसटी बसमध्ये घडला, जिथे दोन महिलांमधील किरकोळ वाद काही क्षणांतच तुफान हाणामारीत बदलला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना महाराष्ट्रातील आहे की नेमकी कोणती ते अद्याप समजू शकले नाही. मात्र एका मोठ्या शहरातील एसटी बसमधील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये(Video) स्पष्टपणे दिसतं की, दोन महिला बसमधून उतरत असल्याचे दिसत आहे. मात्र कोणत्या कारणांवरुन दोघींमध्ये वाद सुरु होतो. त्यानंतर क्षणातच एका महिलेचा संयम सुटतो आणि ती दुसरीच्या कानाखाली जोरदार मारते. इतक्यावरच प्रकरण संपत नाही, तर दुसरी महिला देखील प्रत्युत्तर देत आरडाओरड करत हात उगारते. मग काय, थेट हातघाई होते आणि बसमध्ये बघ्यांची गर्दी जमते.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून तो सध्या इन्स्टाग्रामवरील ram_phalke77 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ एका दिवसांपूर्वीच अपलोड करण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यावर नेटकरी वर्गातून या घटनेचा निषेध करण्यात येत आहेत तर काहीजण विनोदी मीम्स बनवत आहेत.
सोशल मीडियावर काल मुंबई (Mumbai Local) लोकलमधील एक महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महिलांचे वाद शाब्दिक नव्हते तर एकमेंकीना मारहाणीत बदलले होते. या हाणामारीत एका महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती. पण सोशल मीडियावर याआधीही महिलांच्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.
टीप: बसमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.