उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपत आल्या आहेत. १५ जूनपासून शाळा सुरु होतात. शाळा सुरु झाल्यावर मुलांचा शाळेचा पहिला दिवस खूपच स्पेशल आहे. शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक असते. विद्यार्थ्यांना शाळेत नक्की काय होणार? शाळेत आपले मित्र होणार का? असे अनेक प्रश्न पडलेले असतात. तर पालकांना आपल्या मुलांची काळजी असते. आपली मुले शाळेत कशी राहतील? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात.
अनेकदा तर पालक मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेबाहेरच उभे राहतात. शाळेतला पहिला दिवस म्हणजे लहान मुलांचा आरडाओरडा, त्यांचे रडणे, गोंधळ आणि बरच काही. लहान मुलांचा असाच शाळेच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल व्हिडिओत लहान मुले शाळेत जाताना दिसत आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत सोडवताना दिसत आहे. परंतु शाळेत जायच्याआधीच वर्गाबाहेर विद्यार्थ्यांना गोंधळ सुरु झालेला दिसत आहे. अनेक मुले जोरजोरात रडताना दिसत आहे. आपल्या आईचा हात सोडत नाही. आईचा पदर धरुनच रडताना दिसत आहेत. तर एक मुलगी शाळेत बाकावर बसून आपल्या पालकांना बाय-बाय करताना दिसत आहे. एक मुलगा तर पूर्णपणे खाली जमिनीवर लोळत रडताना दिसत आहे. खाली जमिनीवर पडून रडल्यानंतर तो आपल्या पालकांकडे जाताना दिसत आहे.तर अनेक लहान मुले बाकावर बसलेली दिसत आहेत. डोळ्यातील पाणी पुसताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहून सर्वांनाच आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण येईन. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. लहान मुलांचे निरागस रुप या व्हिडिओतून पुन्हा एकदा दिसून येत आहे. लहान मुले आपल्या कुटुंबियांना सोडून कधीच राहू शकत नाही. परंतु अचानक एक ते दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर पुन्हा पालकांना सोडून राहणे मुलांना किती अवघड असते हे या व्हिडिओत दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.