Saam Tv
व्हायरल न्यूज

असं कधी पाहिलंय का? विमानात बसताच प्रवाशांनी म्हटली हनुमान चालीसा; घाबरलेल्या प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल

Passengers On The Plane Chant Hanuman Chalisa: सोशल मीडियावर सध्या एका विमान प्रवासातील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काहीजण अचबिंत झालेले आहेत. कारण प्रवास सुरु होण्यापूर्वी प्रवाशांनी हनुमान चालीसा म्हणाली आहे.

Tanvi Pol

Hanuman Chalisa In Flight: विमानप्रवास म्हणजे अनेकांसाठी एक रोमांचकारी अनुभव, तर काहींसाठी हा अनुभव थोडा काळजीचा आणि भीतीचा असतो. मात्र गेल्या काही वर्षात विमानाचे अपघात झाल्यापासून प्रत्येक प्रवासी प्रवास करताना घाबरलेला दिसतो.पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ या सर्व भावना एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. विमानात टेकऑफ होण्याआधी काही प्रवाशांनी सामूहिकरित्या हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली आहे आणि अवघं विमान त्या पवित्र मंत्रोच्चारांनी भरून गेलं.

विमानातील (Plane) हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स अचंबित झाले आहेत. तर अनेकांनी हा व्हिडिओ आध्यात्मिक दृष्टिकोनातून घेतला, तर काहींनी यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या. पण एकूणच हा प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, विमानात बसलेल्या काही प्रवाशांनी अचानक हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. काही प्रवासी जोरात पठण करत होते, तर काही फक्त कान देऊन ऐकत होते. या दरम्यान काही प्रवाशांच्या चेहऱ्यावर थोडी भीतीसदृश चिंता स्पष्टपणे दिसून येत होती.

टेकऑफपूर्वी विमानात शांतता असते, पण या वेळी वातावरणच काहीसं वेगळं होतं. हनुमान चालीसाच्या प्रत्येक ओळीबरोबर प्रवाशांचं मनोबल वाढत असल्याचंही या दृश्यातून स्पष्ट जाणवत होतं.

विमानातील हा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्रामवरील sripundrik या अकाउंटवर अपलोड केलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून याला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत शिवाय एक्स( ट्वीटर), फेसबूक अशा प्रसिद्ध सोशल मीडिया माध्यमांवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.

टीप: विमानातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT