Viral Bullet Stunt Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Stunt Video: सरदारजींचा स्वॅग भारी! दोन्ही हात सोडले अन् सुसाट बुलेटवर केला थरारक स्टंट; पाहा VIDEO

Viral Bullet Stunt Video: हे सरदारजी त्यांच्या बुलेटवर आरामात हात सोडून सफर करताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांच्या स्टंटचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी त्यांना अशा प्रकारे बाईक चालवून अपघाताला निमंत्रण न देण्याचा सल्लाही दिला आहे.

Gangappa Pujari

Viral Bullet Stunt Video:

सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना. सोशल मीडियावर एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी पाहणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकवतात तर कधी भितीने गाळणही उडते. सध्या असाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये सरदारजींच्या खास स्टंटबाजीने नेटकरीही थक्क झालेत. काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या सविस्तर..

तरुणाईमध्ये बाईक स्टंट (Bike Stunt) करण्याचे वेड नेहमीच पाहायला मिळते. सोशल मीडियावर अशा बाईक स्टंटचे, भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्यांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा असे स्टंट जीवघेणेही ठरतात, ज्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिले असतील, मात्र सध्या एका सरदारजींच्या हटके स्टंटने नेटकरीही अवाक झालेत.

हे सरदारजी त्यांच्या बुलेटवर आरामात हात सोडून सफर करताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांच्या स्टंटचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी त्यांना अशा प्रकारे बाईक चालवून अपघाताला निमंत्रण न देण्याचा सल्लाही दिला आहे. तसेच काही जणांनी प्रतिक्रियांमधून त्यांच्यावर टीकाही केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक सरदारजी त्यांच्या बुलेटवर हात सोडून एका बाजूला पाय ठेऊन आरामात बसलेत. अगदी घरी खुर्चीत बसल्यासारखा जणू त्यांचा थाट आहे. गाडी सुसाट वेगात असतानाही त्यांनी केलेली ही हटके स्टंटबाजी काळजाचा ठोका चुकवणारी आहे. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एका कार चालकाने हा सर्व थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO EDLI Scheme: तुमचं PF अकाउंट आहे? तुम्हाला मिळतो ७ लाखांचा मोफत विमा; कसं? वाचा सविस्तर

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस, हजर होण्याचे आदेश, नेमकं कारण काय? VIDEO

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

SCROLL FOR NEXT