Salman Khan  Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : हम जहा खडे होते है...; मुंबई सेंट्रल स्टेशनवर अचानक 'टायगर'ची एन्ट्री, प्रवासीही चकीत

Viral Video News : मुंबई सेंट्रल स्टेशनवर अचानक सलमान खानने एन्ट्री केली. सलमान खानच्या एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान खानच्या या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

मुंबईमधील कोणतंही रेल्वे स्टेशन म्हटलं तर फलाटावर प्रवाशांची गर्दी ठरलेलीच असते. सीएसएमटी रेल्वे स्टेशन, अंधेरी किंवा मुंबई सेंट्रलवरही प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतेच. मुंबई लोकलमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागतो. प्रवाशांची प्रचंड गर्दी असलेल्या या स्थानकावर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने 'रॉयल' एन्ट्री केली आहे. सलमान खानच्या रॉयल एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

बॉलिवूडच्या भाईजानचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. सलमान खान त्याच्या बॉडीगार्डसोबत दिसत आहे. त्याच्याअवतीभोवती पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा आहे. सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे .सलमान खान त्याच्या 'सिकंदर' सिनेमाच्या शुटिंगसाठी पोहोचल्याची माहिती मिळत आहे.

सलमान खान रेल्वे स्टेशमवर चालताना दिसत आहे. त्याच्या मागे लोकांची गर्दी आहे. सलमानच्या आजूबाजूला पोलीस कर्मचारी देखील दिसत आहे. पोलिसांच्या सुरक्षेत सलमान खान चालताना दिसत आहे. स्टेशनवरील सर्वांच्या नजरा सलमान खानवर भिडल्या आहेत. सलमानचा खानचा आगामी सिनेमा 'सिकंदर' सिनेमासाठी शुटिंग सुरु आहे .

सलमान खानच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियाच्या व्हायरल व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, 'आज गाडी खराब झाली वाटतंय. आज भाई ट्रेनने घरी जाईल'. 'भाईकी बात सबसे अलग है', असेही कमेंट नेटकऱ्याने केली आहे. सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमान खानचा हा व्हिडिओ 'बॉलिवूड सोसायटी' इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. सलमान खानचा हा व्हिडिओ ४२ हजार जणांनी लाईक्स केला आहे. या व्हिडिओवर शेकडो जणांनी कमेंट केल्या आहेत. तर ३ हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याण पश्चिममधील अनुपम नगर परिसरातील घरावर झाड पडल्याने ३ घरांचे नुकसान

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT