Policemen three on bike viral video saam tv
व्हायरल न्यूज

Rules flouted by police: नियम धाब्यावर? एकाच बाईकवरून तीन पोलिसांचा प्रवास; Video Viral होताच लोक संतापले

Policemen three on bike viral video: वाहतूक नियमांचं पालन करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच नियमांचा भंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन पोलीस एका बाइकवर प्रवास करताना दिसले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडिया ही एक अशी गोष्ट आहे जिथे अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. अशामध्ये कोणती चुकीची गोष्ट घडली असेल तर तिचाही व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पाहायला मिळतो. असंच सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ युपी पोलिसांचा असून या व्हिडीयोमुळे पोलीस आणि सामान्य नागरिक यांचा वेगवेगळा कायदा लागू होतो का असा प्रश्न उपस्थित होतोय.

यूपीच्या पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल

या व्हायरल व्हिडीयोमध्ये तीन पोलीस एका बाईकवरून प्रवास करताना दिसतायत. यामध्ये सर्वात मागे बसलेल्या पोलिसाच्या वर्दीवर उत्तर प्रदेश पोलीस असंही लिहीलेलं दिसतंय. बाईक चालवणाऱ्या पोलिसाने हेल्मेट घालतंय, मात्र एका बाईकवरून तीन पोलीस प्रवास करत असल्याने त्याच्यांवर आक्षेप घेण्यात आलाय.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, तीन पोलीस कर्मचारी एका बाईकवरून प्रवास करतायत. वाहतूक नियमांनुसार, बाईकवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती बसणं हे ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन आहे. मात्र असं जर सामान्य नागरिकांनी केलं तर त्यांच्यावर पोलीस दंडात्मक कारवाई करतात. म्हणजेच सामान्यांना चलान भरावा लागतो. त्यामुळे आता या पोलिसांवरही कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.

सर्वांसाठी कायदा सारखा असतो का?

या व्हिडिओमुळे लोकांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालाय की, कायदा सर्वांसाठी समानपणे लागू होतो का? अशावेळी सामान्य नागरिकांना दंड भरावा लागला असता. पण जेव्हा पोलीस कर्मचारीच नियम मोडताना दिसतात, तेव्हा लोकांना शंका येते की, त्यांच्यावरही तितकीच कठोर कारवाई होईल का?

सोशल मीडियावर लोकांनी विचारले प्रश्न

यावेळी ट्विटवरच्या कमेंटमध्ये लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. एका युझरने कायदे आणि नियम फक्त सामान्यांसाठी आहेत, पोलिसांवर कोणतीही कारवाई होणार नाही असं म्हटलंय. तर एका युझरने यांच्यावर एक्शन घेतली का असा थेट सवाल केला आहे. याशिवाय त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करा, असंही एका युझरने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Garam Panyache Fayde: वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्लास गरम पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत वाढ! भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार? मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Indian Forts : बाहेर रणरणतं ऊन अन् किल्ल्यात गारवा! 'या' ७ किल्ल्यांची वास्तुकला पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT