Rose Pakoda Canva
व्हायरल न्यूज

Viral Video : गुलाबी साडीनंतर गुलाबी भजी झाली व्हायरल; नाही कांदा, नाही बटाटा, आता Rose भजी खा!

Rose Pakoda Viral Video: पावसाळ्यात अनेकांना भजी खायला आवडते. पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या की अनेकजण कांदा,बटाटा भजी चा आस्वाद घेतात. पण तुम्ही कधी गुलाब भजी खाल्लीये का? हो, गुलाब भजी, एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यात एक व्यक्ती गुलाबाच्या फुलांची भजी करताना दिसतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकजण सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेक रिल्समध्ये फूड ब्लॉगर्स वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचे व्हिडिओ शेअर करत असतात. अनेकवेळा तर आगळेवेगळ्या पदार्थांचे फ्यूजन पाहायला मिळत असतात. हे व्हिडिओ पाहून नेटकरी आवाक होत आपला हात डोक्याला लावातात. अशाच एका पदार्थाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या व्हिडिओमध्ये एक माणूस चक्क गुलाबाची भजी विकताना दिसतोय.पावसाळ्यात अनेकांना भजी खाण्याची चटक लागते. अनेकलोकं रस्त्यावरील स्टॉलवर वडापाव, भजी सारख्या खाद्यपदार्थांचा अस्वाद घेताना दिसतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भजी बनवण्यासाठी कांद्याचा किंवा बटाट्याचा वापर केला नाहीये.

सोशल मीडियामुळे अनेक लोकं प्रसिद्ध होतात. मात्र काही असे लोकं असतात ज्याच्या आगळ्या वेगळ्या कन्टेंटमुळे सोशल मीडिया गाजवतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस भजी बनवण्याचा स्टॉल आहे. तेथे तो भजी बनवताना दिसतोय. आता तुम्हाला वाटेल यात वेगळं अस काय? तर तो माणूस कांदा किंवा बटाट्याची नाहीतर चक्क गुलाबाची भजी बनवताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी डोक्याला हात लावलाय. पण हो, हा व्याक्ती त्याच्या स्टॉलवर गुलाबाच्या फुलांची भजी बनवताना दिसतोय. तितकच नाही तर व्हायरल व्हिडिओमध्ये एक माणूस त्या गुलाबाच्या भजींचा आस्वाददेखील घेताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये स्टॉलवाला व्यक्ती गुलाब पाण्यात बुडवून त्यानंतर त्या फुलांना बेसनपीठामध्ये बूडवून फ्राय करतो. या व्हिडिओला सोशल मिडियावर प्रचंड शेअर केलं जात आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि ट्विटरवर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. व्हायरल झालेला व्हिडिओ कोणत्या शहरातला आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र नेटकऱ्यानी या व्हिडिओला प्रचंड लाईक आणि शेअर केले आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. आजकल लोकं खाद्यपदार्थ बनवण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर करतील हे सांगता येत नाही.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT