Viral Video Saam Digitl
व्हायरल न्यूज

Viral Video: बंजी जंपिंग करायला गेली अन् दोरीच तुटली... घटनेचा VIDEOपाहून थरकाप उडेल

Accident Viral Video:एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात शेकडो फूट उंचीवरुन एक महिला उडी घेते आणि दोरीच तुटते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bungee Jumping Viral Video

आपल्यापैंकी अनेकांना विविध साहसी गेम खेळायला आवडतात. साहसी गेममधला एक साहसी गेम म्हणजे बंजी जम्पिंग. सोशल मीडियावर बंजी जम्पिंगचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. बंजी जम्पिंगचा थरार अनुभवण्याची आपल्यापैंकी अनेक व्यक्तींची इच्छा असते. जर तुमच्याही बकेट लिस्टमध्ये बंजी जम्पिंग असेल तर त्याआधी व्हायरल झालेला एक व्हिडिओ पाहा.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बंजी जम्पिंगचे व्हिडिओ पाहताना अनेकांच्या मनात एक गोष्ट नक्की येत असेल, ती म्हणजे ही दोरी तुटली तर. पण खरंच ही दोरी तुटली तर काय होत असेल. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात शेकडो फूट उंचीवरुन एक महिला उडी घेते आणि दोरीच तुटते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक महिला बंजी जम्पिंग करण्यासाठी आलेली आहे. बंजी जम्पिंग करण्यासाठी ती सर्व सेफ्टीची शाहनिशा करुन तयार होते.काही वेळानंतर तिथे असलेला माणूस तिला उंचीवरुन धक्का मारतो आणि धक्का मारताच महिला खाली जाते. मात्र यानंतर तिला पुढे काय होईल त्याची कल्पनाही नव्हती. जसे महिलेला बंजी जम्पिंग करण्यासाठी धक्का मारला जातो तेव्हा खाली जाताच महिलेच्या बंजी जम्पिंगची दोरी तूटते अन महिला थेट पाण्यात पडते. या अपघातात महिलेला किती दुखापत झाली असेल नाही माहिती.

व्हायरल होत असलेल्या बंजी जम्पिंगचा थरार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील@FAFO_TVया पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर बंजी जम्पिंगचा थरार अनुभवायचा असल्यास सुरक्षा देखील महत्त्वाची असल्याचे अधोरेखित होत आहे.याआधीही आपण अनेक थरारक साहसी स्टंट करताना झालेले अपघातांचे व्हिडिओ पाहिले आहेत.

सध्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला लाखोंच्या घराच व्ह्यूज मिळाले असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत. व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंटस् केल्या आहेत. एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत लिहिले आहे की,'आम्ही नाही करणार असे साहस'तर काही यूजरने लिहिले आहे की,' बंजी जम्पिंग करणारी तरुणीला दुखापत झालेली नसावी'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Maharashtra News Live Update:नवीन पाणीपुरवठा योजनेत मनपावर ३०० कोटींचा अतिरिक्त भार; टप्पे कमी करण्याचे नियोजन

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

India : भगवान शंकराचं अनोखं मंदिर! जेथे शिवलिंगावर अखंड पडत राहतं गंगाजल, जाणून घ्या कुठे आहे लोकेशन

Besan vs Milk for Face: चेहऱ्यासाठी बेसन की दूध, काय लावणे अधिक फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT