सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल
नववधू कोण आहे? तिचे नाव काय? याची माहिती समोर आलीय.
नेटकरी सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर डोक्यावर पदर आणि हाती गिटार घेत गाणं म्हणणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नववधूने लग्नाच्या एका विधीदरम्यानचा हा व्हिडिओ शूट करून इंस्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये नववधू एक रोमँटिक गाणं गात आहे. या व्हिडिओवर नेटकरी जबराट प्रतिक्रिया देत आहेत.
नववधू गिटार वाजवत एका हिंदी चित्रपटातील 'एक दिन आप यूं ही मिल जाओगे, मैंने सोचा ना था'... हे गाणं गायलंय. वऱ्हाडी मंडळासोबत नेटकरी देखील या सूनबाईच्या गायन कोशल्यावर फिदा झालेत. व्हायरल होणारी सूनबाई नेमकी कोण अशी विचारणा नेटकरी करत आहेत. सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ पोस्ट केले जातात. त्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होत असते. असाच या रॉकस्टार सूनबाईचा व्हिडिओ आहे. नववधूचं गायन कौशल्य पाहून अनेकजण अवाक झालेत.
सोशल मीडियावर ज्या नवविवाहित वधूचा गिटार वाजवणरा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्या नववधूचे नाव तान्या आहे. गाझियाबादमधील मोहम्मद कदीम गावातील उपविभागीय दंडाधिकारी (SDO) आदित्य गौतम यांची ती नवविवाहित वधू आहे. तिने लग्नाच्या आदल्या दिवशी संगीत कार्यक्रमात "मै सोचा ना था एक दिन तुम मुझे मिल जाओगे" हे गाणे गायले. हा व्हिडिओ कुटुंबाने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हि़डिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आदित्य गौतम हे सहारनपूरमध्ये एसडीओ म्हणून तैनात आहेत. मूळचे गाझियाबादच्या मोहम्मद कादिम गावचे ते रहिवाशी आहेत. तर तान्या अलिगडची राहणारी असून ती सहारनपूर येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहे. या दोघांनी २८ नोव्हेंबर रोजी केदारनाथ धाम येथील एका मंदिरात लग्न केलं होतं. त्यानंतर १ डिसेंबर रोजी मेरठ येथे एका हॉटेलमध्ये त्यांच्या रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @lagavbatti या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेत. अनेक नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत. युजर नववधूला रॉकस्टार सूनबाई म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने वाह, क्या बात हैं असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युझरने आता शेजारच्या काकू टोमणे मारतीलअसे म्हटलंय. हे भारी होत असं एका दुसऱ्या युजरनं म्हटलंयतर आणखी एकाने हिने तर सासू आणि नवऱ्याचेही मन जिंकले असणार आहे. मॉर्डन ब्यूटी विथ पांरपारिक टच अशी प्रतिक्रिया दिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.