Rice Sacks Fell On Female Worker CCTV Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : महिलेच्या अंगावर कोसळला गोण्यांचा ढिगारा; थरारक घटनेचा CCTV

Rice Sacks Fell On Female Worker CCTV : अनेकदा काम करताना कामगारांच्या अंगावर अवजड वस्तू पडल्याच्या घटना घडतात. एपीएमसी दाणा मार्केटमध्ये अशीच एक घटना घडली आहे. परंतु समयसुचकतेमुळे या महिलेचे प्राण वाचले आहेत.

Rohini Gudaghe

Viral Video News

एपीएमसी दाणा मार्केटमध्ये काम करत असताना एका महिला कर्मचाऱ्यावर तांदळाच्या गोण्यांचा ढिगारा पडला. मात्र सदर ठिकाणी उपस्थित माथाडी कामगारांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या चपळतेने केवळ 30 सेकंदात गांडळाच्या सर्व गोण्या बाजूला काढत महिलेला वाचविले (APMC Dana Market) आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

या घटनेमध्ये महिला किरकोळ जखमी झाली आहे. जखमी झाल्यामुळे तिला माथाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी महिलेला तात्काळ मदत मिळाली (APMC Dana Market Incident) आहे. या घटनेचा सिसीटीव्ही समोर आला आहे. सर्वत्र माथाडी कामगारांच्या चपळतंच कौतुक करण्यात येतं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेकदा काम करताना कामगारांच्या अंगावर अवजड वस्तू पडल्याच्या घटना घडतात. एपीएमसी दाणा मार्केटमध्ये अशीच एक घटना घडली आहे. परंतु माथाडी कामगारांच्या समयसुचकतेमुळे या महिलेचे प्राण वाचले (CCTV Video) आहेत. ही संपूर्ण घटना मार्केटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला तांदळाच्या गोण्यांच्या ढिगाऱ्याच्या बाजूला सफाईचे काम करत आहे. तिच्या हातात झाडू (Viral Video) आहे. ती गोण्यांच्या आजुबाजूला झाडू मारत आहे, सफाई करत आहे. अचानकपणे गोण्यांचा ढिगारा खाली कोसळतो. सर्व गोण्या खाली पडतात. घटनास्थळी मोठा आरडोओरडा (Viral News) होतो. परंतु या घटनेत या महिलेचे प्राण वाचले आहेत. ४७ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT