Will ration cards be discontinued in Maharashtra? saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: रेशन कार्ड बंद होणार? जनता लाभांपासून वंचित राहणार?

Ration Card Benefits to Continue; आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आता रेशन कार्ड बंद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय...रेशन कार्ड बंद झालं तर धान्य मिळणार नाही का...? या व्हायरल मेसेजवरून आता संभ्रम निर्माण झालंय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Sandeep Chavan

...रेशन कार्ड आता बंद होणार आहे असा दावा करणारा मेसेज व्हायरल केला जातोय...राज्यभरात लाखो लोक रेशनचा लाभ घेतात...त्यामुळे आता एकच खळबळ उडालीय...खरंच रेशनकार्ड बंद होणार आहे का...? रेशन कार्ड बंद झालं तर लाभही मिळणार नाही का...? याबाबत संभ्रम निर्माण झालाय...हा विषय सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे...गावागावात अनेक कुटुंब रेशनचं धान्य घेतात...लाखो गरीबांनाही याचा फायदा होतो...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

रेशन कार्ड आता बंद होणार आहे, लाभापासून अनेकजण वंचित राहणार.

...हा मेसेज व्हायरल होतोय...त्यामुळे अनेकांना याबाबत प्रश्न पडलाय...खरंच आता रेशन कार्ड बंद होणार आहे का...? याची माहिती सरकारकडूनच मिळू शकते...तसेच जिल्हाधिकारीही याबाबत माहिती देऊ शकतात...त्यामुळे आमचे प्रतिनिधी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले...आणि त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती मिळवली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

रेशन कार्ड बंद होणार नाही

ज्यांना रेशनचा लाभ मिळतो ते सुरूच राहिल

प्रत्येक कुटुंबाला एक स्मार्ट कार्ड मिळणार

वन नेशन वन रेशन संकल्पना असणार आहे

ठेवायला सोपं असावं म्हणून स्मार्ट कार्ड देणार

अन्न व नागरी पुरवठा विभागाने ही चांगली योजना आणलीय...आत्तापर्यंत रेशन कार्ड कागदावर हस्तलिखित स्वरुपात नागरिकांना मिळायचं...ते कधी कधी ओलं होतं, खराब होतं...त्यामुळे आता स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे...15 ऑगस्टपासून 26 जानेवारी पर्यंत टप्प्याटप्प्याने हे नवीन स्मार्ट कार्ड प्रत्येकाला मिळणार आहे...पहिल्या टप्प्यात नंदुरबार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर नाशिक जिल्हा घेण्यात आलाय...सुधार योजनेअंतर्गत रेशन कार्डचा डेटा अद्यावत करण्याचे काम सुरू आहे...मात्र, रेशन कार्ड बंद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT