Pune Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'आमची जिम वापरायची नाही' म्हणत तरुणाला मारहाण, रागाच्या भरात डोळाच फोडला; पाहा CCTV VIDEO

Pune Viral Video: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाला सोसायटीमधील जिम वापरायची नाही म्हणत जबर मारहाण करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अक्षय बडवे

Pune Viral Video:

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाला सोसायटीमधील जिम वापरायची नाही म्हणत जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या डोळ्यातून रक्तस्रावही झाल्याचं सांगण्यात येत आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एलिना लिव्हिंग सोसायटी मधील ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. संदीप अगरवाल असं पीडित तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी अगरवाल यांची पत्नीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी रुपेश चव्हाण याला अटक केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात असणाऱ्या एलिना सोसायटी मध्ये ए, बी, सी, डी, ई अशा अनेक विंग आहेत. या सोसायटी मध्ये आधी एकच जिम होती आणि मर्यादित विंग मध्ये राहणाऱ्या रहिवाशी यांच्यासाठी होती. मात्र सोसायटी मधील विंग वाढल्यावर या जिमचे स्थलांतर झाले आणि ती सगळ्यासाठी उपलब्ध झाली. (Latest Marathi News)

26 डिसेंबर रोजी रात्री फिर्यादी यांचे पती व्यायामासाठी गेले असता तिथे असलेल्या अनेक सभासदांशी वाद झाले. "ही जिम सोसायटीमधील ए आणि बी विंग साठी नाही, तुम्ही बाहेर जा" असे तिथे असलेल्या सभासदांनी अरेरावी केली. याच दरम्यान आरोपी चव्हाण यांनी अगरवाल यांना मारहाण करायला सुरुवात केली. या दरम्यान, चव्हाण यांनी अगरवाल यांच्या डोळ्यावर जोरात फटका मारला आणि अगरवाल खाली पडले.

अगरवाल यांच्या डोळ्यातून रक्तस्त्राव सुरु झाला आणि त्यांच्या पत्नीने तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sharechat.com/post/mlGV1mxV?referrer=copyLink

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: नव्या कामाच्या संधी मिळणार, 'या' ४ राशींसाठी दिवस असणार सोन्याचा; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: पुणे- भोंदू बाबा ऋषिकेश वैद्य याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Bike Ride On Skywalk: कोण आहेत हे अती शहाणे? रेल्वे स्कायवॉकवर पळवली दुचाकी|Video Viral

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे ₹१५०० येणार की नाही? ५ मिनिटांत तुम्हीच करा चेक

Weight Loss Recipe : आठवड्यातून २ वेळा करा 'हा' चटपटीत-हेल्दी नाश्ता, पोटाची ढेरी होईल गायब अन् दिसाल स्लिम-ट्रिम

SCROLL FOR NEXT