Prajakta Mali News Saam TV
व्हायरल न्यूज

Prajakta Mali News: प्राजक्ताला स्वत:चे केस विंचरता येत नाहीत? क्यूट VIDEO पोस्ट करत दिली माहिती

Prajakta Mali News: व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की, प्राजक्ताची आणि तिच्या भाचीची खूप दिवसानंतर भेट झाली आहे. त्यामुळे प्राजक्ता तिचा वेळ चिमुकल्या भाचीसोबत घालवत आहे.

Ruchika Jadhav

Prajakta Mali News:

अभिनेत्री प्राजक्ता माळी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. प्राजक्ता अभिनयासह नृत्यातही पारंगत आहे. सुत्रसंचालनाची उत्तम भूमिका ती निभावत असते. तसंच प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. मालिकांच्या माध्यमातून प्राजक्ता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही स्वप्न तिनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राजक्ता सोशल मीडियावर अनेक गोष्टीमुळे चर्चेत असते. मध्यंतरी तिने सोशल मीडियावर नवा फार्म हाऊस घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. अशातच आता प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) पेजवर आपल्या भाचीसोबतचा व्हिडिओ पोस्ट केलाय.

प्राजक्ताने पोस्ट केलेल्या व्हिडिओत ती तिच्या भाचीसोबत गोड संवाद साधत आहे. काय आहे व्हिडिओत आपण पाहूयात. या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की, प्राजक्ताची आणि तिच्या भाचीची खूप दिवसानंतर भेट झाली आहे. त्यामुळे प्राजक्ता तिचा वेळ चिमुकल्या भाचीसोबत घालवत आहे. त्यातच चिमुकली भाची प्राजक्ताचे केस विचंरताना दिसत आहे.

केस विचंरताना आईप्रमाणे तिच्या बोबड्या शब्दांत प्राजक्ताला ओरडत आहे. प्राजक्ताने व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'मला मानेवरचे केस नीट विंचरता येत नसावेत, असं तीला वाटतं ,म्हणून मी बाहेर जाताना आणि आल्यावर माझे केस विंचारते, म्हणून मी घरातून जायची आणि यायची ती वाट बघते.

प्राजक्ताने व्हिडिओ पोस्ट करताच तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने म्हटलं आहे,'किती गोड..हे नातंच अगदी वेगळं आणि गोड आहे.' इतर चाहत्यांना देखील तिच्या भाचीचा गोडंसपणा आवडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

Delhi Blast: बॉम्ब स्फोटप्रकरणी तपास यंत्रणेला मोठं यश; पुलवामा येथून इलेक्ट्रिशियन तुफैलला अटक

Maharashtra Politics : ठाकरेंच्या जागेवर शिंदे-मनसे लढत; उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात मशाल पेटणार, इंजिन धावणार!

Beed Politics : 'मुंडे प्रचाराला आल्यास विपरित घडेल'; बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस?

SCROLL FOR NEXT