Cup From Animal Horns Saam TV
व्हायरल न्यूज

Cup From Animal Horns: प्राण्यांच्या शिंगापासून बनवला चहाचा कप; नॉनवेज भांड्यांचा VIDEO तुफान व्हायरल

Ruchika Jadhav

Animal Horns Business Viral Video:

प्राण्यांच्या चामड्यापासून विविध वस्तू बनवल्या जातात असं तुम्ही ऐकलं असेल. मात्र त्यांच्या शिंगांचे काय होते? असा प्रश्नही तुमच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. प्राण्यांच्या शिंगांपासूनही विविध वस्तू बनवल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांना करोडोंची किंमत आहे. सध्या सोशल मीडियावर शिंगांपासून बनत असलेल्या विविध वस्तूंचा एक व्हिडीओ समोर आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, परदेशातील विविध प्राण्यांची शिंगे एका ठिकाणी साठवून ठेवण्यात आलीत. एक व्यक्ती येथील सर्व शिंगांची विभागणी करत आहे. कोणत्या वस्तूपासून कोणते शिंगं बनवता येणार ते ठरवत आहे. त्यानंतर एक व्यक्ती एक मोठं शिंगं मधोमध कापतो. पुढे त्यापासून वस्तू बनवण्यासाठी त्याला आगीच्या सहाय्याने जाळून लवचीक केलं जातं.

शिंगं लवचीक झाल्यावर आपल्याला हवा तसा त्याला आकार दिला जातो. पुढे तयार झालेल्या वस्तूला लाकडाचा देखील आधार दिला जातो. त्यानंतर फिनीशींगसाठी हे शिंगं पुन्हा एकदा घासून चकचकीत केले जाते. शिंग चकचकीत करून एका लिक्लिडमध्ये टाकले जाते. अशा पद्धतीने व्हायरल व्हिडीओत एक कप तयार करण्यात आला. प्राण्याच्या शिंगापासून तयार झालेला हा कप पाहून नेटकरी देखील चकीत झालेत.

आतापर्यंत तुम्ही स्टील, जर्मल किंवा काचेचे आणि चिनी मातीचे कप पाहिले असतील. मात्र प्राण्यांच्या शिंगांपासून तयार झालेला कप शक्यतो पाहिला नसेल. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींसठी या कपची किंमत फार जास्त आहे. त्यामुळे असे कप परदेशात जास्त वापरल्याचं पाहायला मिळतं. प्राण्यांच्या शिंगांपासून विविध भांडी आणि शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात.

@Thefoodiehat या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करत यावर नॉनवेज भांडी असं मजेशीर कॅप्शन लिहिलंय. साउथ अफ्रिका आणि अमेरीका या देशांमध्ये मोठ मोठे प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे या प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवयवांचा असा वापर केला जातो. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला असून यावर बऱ्याच कमेंट आणि लाईक्स आलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT