Pothole Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Pothole: रस्त्यावरील खड्ड्यांमागचं 'अर्थकारण'; एन्फ्ल्यूएन्सरनं मांडलं भीषण वास्तव, VIDEO

Pothole Video: मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षांपासून सुरू आहे. हा महामार्ग काही अद्याप तयार झाला नाही. या महामार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांचे भीषण वास्तव एका तरुणाने मांडले आहे. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचा प्रश्न कायम.

  • इन्फ्ल्यूएन्सर किरण पास्टेने खड्ड्यांचं अर्थकारण उघड केलं.

  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल,

  • व्हिडिओला नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद.

  • १५ वर्षांपासून महामार्गाचं काम अपूर्ण. यावर्षीही खड्ड्यातून प्रवास करावा लागल्याने गणेशभक्त नाराज.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न खूपच गंभीर होत चालला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्ग खड्डेमुक्त होईल अशी आश्वासनं दिली जातात. पण ही आश्वासनं फक्त आश्वासनंच राहतात. कारण यावर्षी देखील कोकणात जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे गणेशभक्त नाराज झालेत. यावर्षी देखील त्यांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला.

एका तरुणाने या महामार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित करत सत्य परिस्थिती सांगितली. या तरुणाने रस्त्यावरील खड्ड्यांमागचं अर्थकारण एकदम सोप्या शब्दात सांगितले आहे. या तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. अनेक जण या तरुणाचे कौतुक करत आहेत.

किरण पास्टे नावाच्या या तरुणाने हा व्हिडीओ तयार केला असून त्याने तो फेसबुकवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो रस्त्याच्या कडेला उभं राहून खड्डे दाखवत सांगत आहे की, जर तुम्हाला वाटत असेल की हे खड्डे आहेत तर तुम्ही चुकीचे आहात. कारण हे खड्डेच आपल्याला आणि पूर्ण देशाला चालवत आहेत. त्यानंतर ज्यांच्यामुळे हे खड्डे आहेत ते कमावत आहेत. खड्डे भरणारे कमावत आहेत. त्यानंतर या खड्ड्यांमुळे जर आपल्या गाड्यांचे नुकसान होत असेल तर सर्व्हिस सेंटरवाले कमावतात आणि जर या खड्ड्यांमुळे अपघात झाला तर डॉक्टर आणि इन्शूरन्स कंपनीवाले कमावत आहेत. त्यानंतर या खड्ड्यांवर रील बनवून आमच्यासारखे इन्फ्यूअन्सर कमावत आहेत.'

या व्हिडीओमध्ये पुढे असे म्हटले आहे की, 'आज १५ वर्षे झाले तरी मुंबई-गोवा हायवे बनला नाही. तेव्हा कुठे आपला देश महासत्ता बनायला चालला आहे. अजून ५० वर्षे जरी हा रस्ता नाही झाला ना तर नक्की अमेरिकेला टक्कर देऊ. जर तुम्ही अजूनही या खड्ड्यांना शिव्या देत असताल तर तुम्ही या खड्ड्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला कारण हे खड्डे खरंच खूप चांगले आहे.' तर या व्हिडीओच्या शेवटी हा तरुण'एक आडवा न तिडवा खड्डा चंद्रावानी पडलाय गं, याला कंत्राटदार हसतोय कसा की कोकणकर पडला गं. या आकांताचा तुला इशारा कळला गं' हे गाणं गाताना दिसतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT