सध्या गरजेपेक्षा प्लास्टिकचा वापर वाढलाय. प्लास्टिक निसर्गासाठी किती हानिकारक आहे हे वारंवार समोर येऊनही आपण प्लास्टिकचा वापर कमी करायला तयार नाहीत. हे कमी होतं म्हणून की काय आता हे प्लास्टिक थेट माणसाच्या मेंदूपर्यंत पोहचल्याचा दावा केला जातोय, माणसाच्या मेंदूत प्लास्टिक जमा होत असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजनं सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकलीय. साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधून काढलंय.
प्लास्टिकच्या अतिरेकी वापरामुळे निसर्गाचा समतोल ढासळतोय. प्लास्टिकमुळे जशी पर्यावरणाची हानी होतीय तसच ते मानवी आरोग्यासाठीही घातक आहे. असं असतानाही प्लास्टिकचा बेसुमार वापर सुरूच आहे. आता याच प्लास्टिकनं तुमच्या मेंदूचाही ताबा घ्यायला सुरुवात केलीय. सोशल मीडियात याबाबत एक धक्कादायक मेसेज व्हायरल होतोय, या मेसेजमध्ये काय म्हंटलंय ते आधी पाहूयात..
प्लास्टिकनं आता तुमच्या शरीरात एण्ट्री घेतलीय. संशोधकांना माणसाच्या मेंदूत प्लास्टिक सापडलंय. प्रायव्हेट पार्टपासून ते मेंदूपर्यंत तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागात मायक्रोप्लास्टिक साचलंय. माणसाच्या शरीरात प्लास्टिकचं प्रमाण वाढत राहिलं तर येणारी पिढी कॅन्सरग्रस्त होईल.
या मेसेजनं सगळ्यांच्याच पायाखालची वाळू सरकलीय. प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक सापडल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. प्लास्टिकमुळे सागरीजीवन धोक्यात आलंय. आता याच प्लास्टिकचं बूमरँग माणसाच्या जीवावर उठलंय. साम टीव्हीनं या मेसेजची चाचपणी केली. आम्ही तज्ज्ञांकडून याबाबत अधिकची माहिती जाणून घेतली.
आम्ही गुगल रिसर्च करून या मेसेजबाबत काही तथ्य शोधून काढली. तेव्हा कोणती धक्कादायक माहिती समोर आली पाहा. अभ्यासकांनी अलिकडेच मानवी शरीरावर संशोधन केलं. तेव्हा त्यांना माणसाच्या मेंदूत मायक्रोप्लास्टिक आढळून आलं. हे प्लास्टिक 5 मिलीमीटरपेक्षा कमी 1 नॅनोमीटर इतकं होतं. खाण्या-पिण्यातून हे तुकडे माणसाच्या शरीरात पोहचले होते. अभ्यासकांच्या मते माणसाच्या मेंदूत 0.5 टक्के माइक्रोप्लास्टिक जमा होत असून ते अत्यंत धोकादायक आहे. याचाच अर्थ 99.5 % मानवी मेंदू हा मेंदू आहे तर उर्वरीत भाग प्लास्टिक..याशिवाय लिव्हर आणि किडनीतही प्लास्टिक आढळून आलंय.
त्यामुळे आमच्या पडताळणीत माणसाच्या मेंदूत प्लास्टिक आढळल्याचा दावा सत्य ठरलाय. मात्र हे संशोधन परदेशात झालंय. भारतात असे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. अर्थात त्यामुळे प्लास्टिकच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. प्लास्टिकचा वापर टाळा. नाहीतर खरोखरच भविष्यात आपल्या मेंदूचा ताबा प्लास्टिक घेईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.