Akola Framer Audio Viral Clip Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Audio Clip: कृषी अधिकाऱ्याचा उद्दामपणा! शेतकऱ्यासोबतच्या फोनवरील संवादाची 1 मिनिटाची ऑडिओ क्लिप ऐकाच

Akola Framer Audio Viral Clip: सोशल मीडियावर सध्या कृषी अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप खूप व्हायरल होत आहे. यात हा कृषी अधिकारी शेतकऱ्याशी उद्दामपणे बोलत असल्याचं ऐकू येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

एकीकडे कापसाच्या बियाणावरून शेतकरीआक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे कापसाचं बियाणं म्हणजे चॉकलेट आहे का? असं उद्दाम उत्तर कृषी अधिकाऱ्यानं दिलंय. शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यामधल्या संवादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

कृषी अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये काय झाला संवाद?

शेतकरी: हॅलो साहेब, गोपाळ ठाकरे बोलतोय.. शेतकरी.

कृषी अधिकारी: बोला.. ना.

शेतकरी: अजित 155 च्या बॅगा पाहिजे होत्या

कृषी अधिकारी: साहेब, कुठेच बॅगा नाहीत अजिबात. काल पूर्ण विक्री आटोपल्या अजितच्या. आता आम्ही मार्केटमध्येच आहोत. कलेक्टर साहेबाकडे चाललोत. लोकांचा उधम सुरू आहे सर्व.

शेतकरी: हो सकाळपासून दुकानात थांबलो. दुकानही बंद आहेत.

कृषी अधिकारी: आम्हीपण मार्केटमध्येच आहोत सकाळपासून... शेतकऱ्यांना आवरायला... कोणीच ऐकायला तयार नाही..

शेतकरी: पण आम्हाला बियाणं पाहिजे ना साहेब.

कृषी अधिकारी: अहो बियाणं काय आपल्या चॉकलेटसारखं आहे का? आपण तयार करू, उत्पादन करू... त्याला आठ महिने लागतात उत्पादन करायला.

शेतकरी: आम्हाला उत्पादन भेटलं पाहिजे.

ही ओडिया क्लिप सोशल मीडियावर खूप व्हयरला होत आहे. कृषी अधिकाऱ्याचं उद्दाम उत्तर ऐकून अनेक नेटकाऱ्यानी आपला रोष व्यक्त केला आहे. तसेच या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. दरम्यान, या व्हायरल क्लिपची सत्यता पडताळली नसून आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची जोरदार धडक, कारचा चेंदामेंदा; एकाच कुटुबांतील ३ जणांचा मृत्यू , २ जखमी

महाराष्ट्र हादरला! शिंदेसेनेच्या २ नगरसेवकांकडून गोळीबार; एकाचा मृत्यू, ४ जखमी, १६ जणांवर हत्येचा गुन्हा

Weigh Loss: वजन कमी करायचंय? मग, रिकाम्या पोटी खा 'या' ७ गोष्टी; होईल झटपट फॅट बर्न

ओल्या नारळाची कुरकुरीत भजी; पावसाळ्यात नक्की ट्राय करा

Pune : पुण्यातील जप्त केलेल्या ६ कोटींच्या ड्रग्जचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन, गोल्फ कोर्सचा हमाल बनला 'बेनी'चा दलाल

SCROLL FOR NEXT